आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NEET Exam Start From Today, News And Updates; ID Checking By Barcode Following Touch Of Corona Protocol, Touchfree Access; All The Candidates Will Be Required To Carry ID

आजपासून NEET:कोरोनाचे प्रोटोकॉल पाळत बारकोडने आयडी चेकिंग, टचफ्री प्रवेश; सर्व परीक्षार्थींना आयडी बाळगणे गरजेचे राहणार

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तामिळनाडू : नीटला विरोध, विद्यार्थिनीची आत्महत्या

इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेनंतर (जेईई-मेन्स) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) आजपासून देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) घेणार आहे. जेईईच्या विपरीत नीट ही पेन-उत्तरपत्रिका आधारित देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय परीक्षा आहे. एकूण १५.९७ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील. दरम्यान, कोरोना सावटात होणाऱ्या या परीक्षेसाठी फिजिकल डिस्टन्सिंगच्या पालनासह इतर सुरक्षा मानकांची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने केंद्रांची संख्या २५४६ वरून ३८४३ करण्यात आली आहे. एका खोलीत २४ ऐवजी १२ परीक्षार्थी असतील. परीक्षा दुपारी २ ते संध्याकाळी ५ दरम्यान होईल. परीक्षार्थींना ४५ मिनिटांआधी प्रवेश दिला जाईल.

परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार, परीक्षा कक्षातही सॅनिटायझरची व्यवस्था असेल. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना तीन लेअरचा मास्क दिला जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या दिशानिर्देशानुसार, एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश आहेत.

तामिळनाडू : नीटला विरोध, विद्यार्थिनीची आत्महत्या

तामिळनाडूतील अरियालूर जिल्ह्यात १९ वर्षीय ज्योतिश्री दुर्गा या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नीटबाबत तणाव आणि भीतीचा उल्लेख केलेला आहे. उपमुख्यमंत्री अाे. पन्नीरसेल्वम यांनी घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. सत्ताधारी एआयएमडीके आणि विरोधी पक्ष डीएमकेसह सर्व पक्षांकडून नीटला विरोध होत आहे. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायण म्हणाले, केंद्र सरकार विद्यार्थ्यांना जोखमीत टाकत आहे.

ही काही शेवटची परीक्षा नाही...जीवनात खूप काही बाकी आहे - मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला

एखाद्या परीक्षेच्या निकालामुळे किंवा ती देता न आल्याने निराश होणे हाच अखेरचा पर्याय नाही. आपल्या जीवनात आणखी खूप काही बाकी आहे. तुम्ही हे समजू शकत नसाल तर पालक, मित्र, शिक्षकांशी चर्चा करा. - डॉ. अचल भगत, सीनियर कन्सल्टंट, मनोविकार विभाग, इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात

बातम्या आणखी आहेत...