आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नीट-जेईई परीक्षांविषयी देश-विदेशातील यूनिव्हर्सिटीजच्या 150 शिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले की, 'जर या परीक्षांना जास्त उशीर झाला तर हा विद्यार्थ्यांच्या करिअरसोबत खेळ होईल. काही लोक आपल्या राजकीय अजेंड्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत'
अॅडमिशन आणि क्लासेसवरील शंका लवकरात लवकर दूर करणे गरजेचे
या पत्रामध्ये लिहिण्यात आले आहे 'तरुण आणि विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत, मात्र कोरोना महामारीमुळे त्यांचे करिअर धोक्यात आले आहे. अॅडमिशन आणि क्लासेसविषयी अनेक शंका आहेत, ज्या लवकरात लवकर दूर करणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षीप्रमाणे यावेळीही लाखो विद्यार्थ्यी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. मात्र ते यावर्षी घरात बसून काय करायचे आहे याविषयी विचार करत आहेत.'
तरुणांच्या स्वप्नांमध्ये तडजोड केली जाऊ नये
सरकारने जेईई-मेन्स आणि एनईईटी परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. आता परीक्षांमध्ये दिरंगाई केल्यास विद्यार्थ्यांची मौल्यवान वर्षे वाया जातील. तरुणांच्या स्वप्नांचा आणि भविष्याबाबत कोणत्याही किंमतीत तडजोड केली जाऊ नये. आम्हाला खात्री आहे की सरकार जेईई आणि एनईईटी परीक्षा सुरक्षेसह घेण्यात यशस्वी होतील आणि 2020-21 चे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले जातील.
मोदींना चिठ्ठी लिहिणाऱ्यांमध्ये या 10 प्रमुख यूनिव्हर्सिटीजचे शिक्षक सामिल होते
1. दिल्ली यूनिव्हर्सिटी 2. इग्नू 3. लखनौ यूनिव्हर्सिटी 4. जेएनयू 5. बीएचयू 6. आयआयटी, दिल्ली 7. यूनिव्हर्सिटी ऑफ लंडन 8. यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्निया 9. हिब्रू यूनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम 10. बेन गुरियन यूनिव्हर्सिटी , इजरायल
कोरोना दरम्यान जेईई-मेन्स आणि एनईईटीची परीक्षा आता विरोधीपक्षाचा मुद्दा बनला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, सर्व राज्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात यावे. यानंतर निर्णय घेण्यात आला की, सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली जाईल. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी न्यायालयात जाण्यापूर्वी राष्ट्रपतींना भेटण्याचे सांगितले.
जेईई-मेन परीक्षा 7-11 एप्रिल आणि नीट 3 मे रोजी होणार होती. मात्र कोरोनामुळे ही परीक्षा दोन वेळा टाळण्यात आली. आता सप्टेंबर महिन्याचे शेड्यूल आहे. या परीक्षांना अजून टाळण्याचा अर्ज सुप्रीम कोर्टाने पहिलेज रद्द केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसी (एनटीए)ने मंगळवारी म्हटले होते की, परीक्षा आता वेळेवर म्हणजेच जेईई 1 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबरपर्यंत आणि नीट 13 सप्टेंबरला केली जाईल. दूसरीकडे या परीक्षांचा विरोध करणाऱ्या राज्यांची मागणी आहे की, कोरोना परिस्थिती पाहता सध्या परीक्षा घेणे गरजेचे नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.