आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • NEET JEE Updates : 150 Academicians Written To Prime Minister Narendra Modi Saying Delaying Will Mean Compromising Future Of Students

नीट-जेईई वर मोदींना पत्र:देश-विदेशातील 150 शिक्षकांनी पंतप्रधानांना लिहिले - परीक्षांना उशीर झाल्यास विद्यार्थ्यांच्या भवितव्याची हेळसांड होईल, काही लोक राजकीय अजेंडा चालवत आहेत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिगर एनआरडीए शासित 7 राज्ये कोरोनामुळे नीट-जेईई पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत
  • मोदींना पत्र लिहिणाऱ्या शिक्षकांनी म्हटले - लाखो विद्यार्थ्यांचे करिअर अडकले आहे

नीट-जेईई परीक्षेसंदर्भात भारत आणि परदेशातील विद्यापीठांतील सुमारे दीडशे शिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले आहेत की "या परीक्षांना आणखी विलंब झाल्यास विद्यार्थ्यांच्या करिअरची हेळसांड होईल." काही लोक आपल्या राजकीय अजेंड्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत.

अॅडमिशन आणि वर्गांबाबतच्या शंका लवकर दूर करणे आवश्यक

या पत्रात म्हटले की, "युवा आणि विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. मात्र कोरोना महामारीमुळे त्यांचे करिअर अडचणीत सापडले आहे. अॅडमिशन आणि वर्गांबाबत अनेक शंका आहेत, त्या लवकरात लवकर दूर करणे आवश्यक आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळेसही लाखो विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले, परंतु आता ते घरी बसून पुढे काय करावे याची वाट पहात आहेत."

तरुणांच्या स्वप्नांशी तडजोड केला जाऊ नये

"सरकार जेईई-मेन आणि नीट परीक्षांच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. आता याला आणखी विलंब झाल्यास विद्यार्थ्यांचे किमती वर्ष वाया जाईल. युवकांचे स्वप्ने आणि भविष्याशी कोणत्याही किमतीवर तडजोड झाली नाही पाहिजे. आम्हाला खात्री आहे की जेईई आणि एनईईटी परीक्षा सुरक्षेसह आयोजित करण्यात सरकार यशस्वी होईल आणि 2020-21 चे शैक्षणिक कॅलेंडर देखील जारी केले जाईल."

मोदींना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये या 10 अग्रगण्य विद्यापीठांचे शिक्षक देखील सहभागी

1. दिल्ली युनिव्हर्सिटी

2. इग्नू

3. लखनऊ युनिव्हर्सिटी

4. जेएनयू

5. बीएचयू

6. आयआयटी, दिल्ली

7. युनिव्हर्सिटी ऑफ लंडन

8. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया

9. हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ जेरुसलेम

10. बेन गुरियन युनिव्हर्सिटी, इस्त्राईल

बिगर एनडीए शासित 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची इच्छा

कोरोना दरम्यान जेईई-मेन्स आणि एनईईटीची परीक्षा आता सरकार विरुद्ध विरोधकांचा मुद्दा बनली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, सर्व राज्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात जावे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला. तर झारखंडचे मुख्यमंत्री सीएम हेमंत सोरेन यांनी न्यायालयात जाण्यापूर्वी राष्ट्रपतींना भेटण्याची चर्चा केली.

जेईई-मेन परीक्षा 7-11 एप्रिल आणि नीट 3 मे रोजी होणार होती, मात्र कोरोनामुळे या परीक्षा दोन वेळेस पुढे ढकलण्यात आल्या. आता सप्टेंबरचे वेळापत्रक आहे. या परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळून लावली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) देखील मंगळवारी सांगितले होते की परीक्षा आता निर्धारित वेळेत म्हणजेच जेईई 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर आणि नीट 13 सप्टेंबरला घेण्यात येणार आहेत. दुसरीकडे, या परीक्षांना विरोध करणारी राज्ये म्हणत आहेत की कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही.

0