आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NEET PG 2022 Results Announced In Just 10 Days | Union Health Minister Congratulates The Students Who Have Passed

नीट पीजी परिक्षेचा निकाल जाहीर:केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन; येथे पाहा तुमचा निकाल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-पीजी म्हणजेच NEET-PG 2022 चा निकाल जाहीर केला आहे. अवघ्या 10 दिवसांत निकाल जाहीर केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसचे कौतुक केले आहे. NEET-PG 2022 चा निकाल जाहीर करताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. परिक्षा दिलेले उमेदवार त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर पाहू शकतात.

NEET PG 2022 कट ऑफ देखील जारी करण्यात आला आहे. यासाठीची गुणवत्ता यादी राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल. उमेदवार 8 जून 2022 रोजी किंवा त्यानंतर nbe.edu.in वरून वैयक्तिक स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतील. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-पोस्ट ग्रॅज्युएट-2022 (NEET-PG 2022) 21 मे रोजी 849 केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेत एकूण 1,82,318 उमेदवार बसले होते.

या पद्धतीने तुम्ही निकाल पाहू शकता

natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवर NEET PG निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
आता NEET PG चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंट आउट घ्या.

बातम्या आणखी आहेत...