आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Neet PG Marathi News |Center To Reconsider Rs 8 Lakh Income Limit For EWS, Counseling Banned For A Month

नीट-पीजी:ईडब्ल्यूएससाठी 8 लाखांच्या उत्पन्न मर्यादेवर फेरविचार करणार केंद्र, कौन्सिलिंगला महिनाभर बंदी

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत (ईडब्ल्यूएस) वर्गाच्या आरक्षणात क्रीमी लेअरसाठी निश्चित ८ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्न मर्यादेवर केंद्र सरकार फेरविचार करणार आहे. ही मर्यादा नव्याने ठरवली जाईपर्यंत कौन्सिलिंग होणार नाही. साॅलिसिटर जनरल तुषार मेहतांनी सुप्रीम काेर्टात केंद्राकडून ही माहिती दिली. ते म्हणाले, क्रीमी लेअर ठरवण्यासाठी एक समिती ४ आठवड्यांत निर्णय घेईल. न्या. डी.वाय.चंद्रचूड यांच्या पीठाने प्रवेशांत होणाऱ्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली.

कोर्ट केंद्राच्या कोट्यातील जागांवर आर्थिकदृष्ट्या कमकुवत (ईडब्ल्यूएस) वर्गाला १० टक्के व इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण देण्याच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करत होते.

न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी आरक्षण प्रगतिशील व उत्तम निर्णय आहे. मात्र, एकमेव सवाल असा आहे की, ईडब्ल्यूएससाठी क्रीमीलेअरची निश्चित वैज्ञानिक पद्धतीने झाली पाहिजे. केंद्राने आधीच्या निकषांवर फेरविचाराचा निर्णय घेतल्याची आम्ही स्तुती करतो. केंद्र सरकारने ते पुढील सत्रापासून लागू करावे. मात्र, हे योग्य ठरणार नाही, असे मेहता यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...