आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीट-यूजीचा निकाल जाहीर:नीटचा निकाल जाहीर; राजस्थानची तनिष्का टॉपर

दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) बुधवारी रात्री नीट-यूजीचा निकाल जाहीर केला. राजस्थानची तनिष्का ९९.९९ पर्सेंटाइलसह टॉपर राहिली. तनिष्का ओबीसी(नॉन क्रिमी लेयर) वर्गाची आहे. दिल्लीचा वत्स आशिष बत्रा दुसरा आणि कर्नाटकचा ऋषिकेश नागभूषण गंगुले तिसरा आला. कर्नाटकची ऋचा पवाशे चौथी तर तेलंगणचा ई.सिद्धार्थ राव पाचवा आला. चार टॉप विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल ९९.९९९७७३३ आहे. टॉप पाचमध्ये ३ सामान्य वर्गातील तर २ ओबीसी वर्गातील आहेत.उत्तर प्रदेशातील १,१७,३१६, महाराष्ट्रातील १,१३,८१२ विद्यार्थी यशस्वी झाले.

बातम्या आणखी आहेत...