आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Negligence Of MLAs Towards Their Own Party Is Dangerous For Democracy: Justice. Ramana

पक्षचिन्हाबाबत निर्णय नको:आपल्याच पक्षाकडे आमदारांचे दुर्लक्ष हे लोकशाहीसाठी घातक : न्या. रमणा

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतर्गत वादावर सुनावणी होईपर्यंत शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये. मात्र, याप्रकरणी आयोग सुनावणी घेऊ शकतो, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक आयोगाला दिले. दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्द्यांवर प्रलंबित असलेल्या याचिकांवरील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. हे प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे पाठवायचे की नाही याबाबत सोमवारी निर्णय घेऊ, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या वेळी सरन्यायाधीश रमणा यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी करत आपल्याच पक्षाकडे आमदारांचे दुर्लक्ष हे लोकशाहीसाठी घातक ठरेल, असेही मत नाेंदवले. सत्तासंघर्षावर शिवसेनेकडून दाखल असलेल्या ५ याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि हिमा कोहली यांच्यापुढे सुनावणी झाली. बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांना नव्याने आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार शिंदे गटाकडून साळवे, सेनेकडून कपिल सिब्बल आणि निवडणूक आयोगाकडून अरविंद दातार यांनी मत मांडले.

ठाकरे-शिंदेसेना वाद : प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्याबाबत सोमवारी निर्णय शिंदेसेनेकडून साळवे पक्षांतरविरोधी कायदा हा मतप्रदर्शनविरोधी असू शकत नाही. आमदारांनी मूळ पक्ष सोडलेला नाही. अध्यक्षाला निर्णयासाठी २ महिने लागले तर याचा अर्थ काय? या सर्व आमदारांनी सभागृहाच्या कामकाजात हजर राहणे बंद करावे का ? प्रत्येक प्रकरणात अध्यक्षांवर आरोप केले जातील, ही काही विलक्षण गोष्ट नाही.

ठाकरे सेनेकडून सिब्बल या प्रकरणासाठी मोठ्या खंडपीठाकडे जाण्याची गरज नाही. शिंदेंचा गट सांगत आहे की त्यांना ४० आमदारांचा पाठिंबा आहे. आपणच राजकीय पक्ष असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. ४० आमदार अपात्र ठरले तर त्यांच्या दाव्याला आधार काय आहे? बंडखोरी केलेल्या आमदारांना आम्ही पक्षाचे सदस्य मानत नाही.

आयोगाकडून दातार जर आमचा मूळ पक्ष असल्याचा दावा असेल तर आम्ही कायदेशीररीत्या त्यावर निर्णय घेण्यास बांधील. विधानसभेतून अपात्रता हा वेगळा मुद्दा आहे. आम्ही ठेवलेल्या तथ्यांवर आधारित निर्णय घेतो. निवडणूक आयोग स्वतंत्र संवैधानिक संस्था आहे आणि १० वी सूची या कामात अडथळा आणू शकत नाही.

पुढे काय आमदार अपात्र ठरल्यास ? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात गेला आणि आमदार अपात्र ठरले तर भाजप आणि शिंदे गटासमोर काय पर्याय आहेत, यासंदर्भात फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतील, अशीही चर्चा आहे. तसेच शिंदेही चाचपणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंना तूर्तास दिलासा मिळाल्याची चर्चा सुनावणीदरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. गुरुवारच्या सुनावणीत सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, आता सोमवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...