आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Neighbor Raped Minor | Marathi News | Rape | When Pornographic Photos Went Viral, The Victim's Brother Came To Know About The Incident In Mumbai

धक्कादायक!:14 वर्षीय चिमुरडीवर 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने केला बलात्कार; सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर घटना उघडकीस

नागौरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एका 14 वर्षीय मुलीवर घराच्या बाजूलाच राहणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना राजस्थानच्या नागौर येथे घडली आहे. आरोपी अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्यानंतर पीडित मुलीचे फोटो काढून सोशल मीडियावर देखील शेअर केले आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरुन आरोपी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
सदरील अल्पवयीन आरोपीने पीडितेवर बलात्कार करुन तिचे फोटो देखील काढले होते. त्यानतंर त्याने ते सर्व फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल केले. सदरील घटना 3 जानेवारीला घडली असून, सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर तसेच कुटुंबियांना सदरील घटनेची माहिती झाल्यानंतर सदरील आरोपी अल्पवयीन मुलावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला केली अटक

कुटुंबियांना दिलेल्या तक्रारीवरुन सदरील घटनेतील आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. चौकशीत असे समोर आले आहे की, हे दोघेही घराच्या आजुबाजुलाच राहतात. पीडित मुलीचा भाऊ मुंबईत असतो. त्याने सोशल मीडियावर पाहिले असता, तिच्या बहिणेची फोटो त्या आरोपी मुलाने व्हायरल केले होते, त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.