आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Neither Social Distancing, Nor Quarantine Stamp, Rush Of Passengers For Baggage Check

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली, मुंबई आणि कोलकाता एअरपोर्टची परिस्थिती:येथे ना सोशल डिस्टेंसिंग, न क्वारंटाइन स्टँप, ना कोणतीही तपासणी, प्रवाशांमध्ये दिसत नाही कोरोनाची भीती, लगेज चेक पॉइंटवर गर्दी 

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फ्लाइटमध्ये जाण्याच्या घाईमुळे प्रवासी एअरपोर्ट स्टाफच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करत आहेत
  • वापरलेले मास्क, प्रोटेक्टिव कव्हिरिंगसारख्या वेस्टमुळे रेस्पिरेट्री व्हायरस पसरण्याचा धोका

25 मेपासून भारत सरकारने देशांतर्गत हवाई प्रवास सुरू केला. कोविड 19 ला थांबविण्यासाठी उपाययोजना केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी जनतेला आश्वासन दिले होते. खरंतर, देशभरातील वाढती प्रकरणे लक्षात घेता, सुरक्षा यंत्रणेच्या कमी उपाययोजनांमुळे देशातील हवाई मार्गांद्वारेही प्रकरणे वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. 6 जुलै रोजी कोलकाता विमानतळावर दिल्ली, मुंबईसह भारतभरातून येणाऱ्या फ्लाइट्सवर बंदी घालण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते प्रवाश्यांमुळे कोविडची प्रकरणे वाढली आहेत.

प्रोटोकॉलचे पालन होत नाही

22 जून रोजी, दिल्ली ते मुंबई या विमान प्रवासादरम्यान डीडब्ल्यूच्या एका पत्रकारास सुरक्षेच्या अनेक त्रुटी आढळल्या. दिल्ली विमानतळावरील प्रवासी सोशल डिस्टेंसिंगचे पालन करीत नव्हते. याशिवाय या नियमांची चौकशी करण्यासाठी कोणताही अधिकारी तेथे हजर नव्हता. तर एप्रिलमध्ये विमानतळ सेवा व्यवस्थापक जीएमआरने माध्यमांना आश्वासन दिले होते की प्रोटोकॉलचे पालन व्हावे यासाठी अनेक कर्मचारी तैनात केले जातील.

विमानतळ कर्मचारी म्हणाले 'आम्ही काय करू शकतो'
बॅगेज स्क्रीनिंग दरम्यान लोक गर्दी करत होते. सिक्युरिटी चेक पॉइंटवरही पुरेसे कर्मचारी नव्हते. केवळ दोन-तीन कर्मचारी असल्याने लोक घाई करत होते. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'महामारीच्या काळात क्लियरेंससाठी जास्त वेळ लागतो. यामुळे येथे गर्दी वाढते. यामुळे सिक्युरिटी गेटवरही रांग वाढते.

बोर्डिंग गेटवर लोक विमानात चढण्याच्या घाईत होते आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या सोशल डिस्टेंसिंगच्या अवाहनाकडे दुर्लक्ष करत होते. विमानतळावरील कर्मचारी म्हणाले, "आम्हाला प्रवाशांना सांभाळणे अवघड जात आहे. स्वत: चा बचाव करत त्यांना सोशल डिस्टंसिंगसाठी सतत सांगत राहणे खूप कठीण आहेत. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत पण लोकांना ऐकायचे नसेल तर आम्ही काय करू शकतो. "

मुंबई विमानतळाचे हाल 
मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर डॉक्टर आणि सरकारी अधिकाऱ्यांसारख्या आवश्यक कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे उभे करण्यात आले. यानंतर त्यांना 14 दिवसांचे क्वारंटाइनचे शिक्के न देताच जाऊ दिले. एक अधिकारी म्हणाले की, 'जर तुम्हाला कामासाठी बाहेर जावे लागत आहे तर तुम्हाला स्टँम्पची गरज नाही' मात्र एका एअरपोर्ट अधिकाऱ्यानुसार, विना स्टँपचे बाहेर जाण्याची परवानगी कोणालाही नाही. मुंबई एअरपोर्टच्या प्रवक्तानुसार, सर्व देशांतर्गत प्रवाशांची स्क्रिनिंग केली जात होती आणि क्वारंटाइनसाठी हँड स्टँप दिला जात होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser