आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Neither Work From Home Nor Vacation; Working On The Virus, Still The Are Not Infected With Corona From 13 Months

यांच्याकडून शिका:ना वर्क फ्रॉम होम ना सुटी; विषाणूवर काम, तरी कोरोना संसर्गाचा 13 महिने स्पर्श नाही

हैदराबाद(प्रमोदकुमार)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीसीएमबी लॅब, हैदराबादचे कोराेनावरील विजयाचे उदाहरण
  • एकत्र राहूनही ६६० जणांपैकी काेराेना संसर्गाची एकही घटना नाही

जगातील प्रत्येक विषाणू तयार करणाऱ्या अाणि त्यावर प्रयाेग करणारी हैदराबाद येथील सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी)ही जागतिक पातळीवरील प्रयाेगशाळा. येथे ६० शास्त्रज्ञ, १५० पीएचडी संशोधक, ४५० सहयाेगी कर्मचारी असे एकूण ६६० लोक येथे दररोज एकत्र काम करतात. कोरोनाच्या काळातही त्यांना ना वर्क फ्राॅमची सुविधा ना काेणती सुटी. कँटीनमध्ये २४ तास मिळणारे पदार्थ खाऊनच त्यांचे पाेट भरते. सीसीएमबीमध्ये सध्या काेराेना विषाणूवर संशाेधन सुरू अाहे. व्हायरसवर संशोधन करणे, लस कंपन्यांना मदत करणे हे त्यांचे रोजचे काम आहे. परंतु संपूर्ण देशासाठी प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे गेल्या १३ महिन्यात एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही. ना शास्त्रज्ञ, ना तरुण संशोधक किंवा सहायक कर्मचारी. आतापर्यंत कोरोना संसर्गाची एकही घटना घडलेली नाही. येथील भिंतीवर लिहिलेल्या, ‘साेशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे अाणि हात धुणे.’ या घाेषवाक्याची सर्व पथकाला याची जणू सवयच झाली अाहे. संचालक राकेश मिश्रा म्हणतात, हे बघा, अाम्ही तर विषाणू बनवत अाहाेत, पण त्याचे अाम्ही वाहक (कॅरिअर) बनलाे नाही. ही सतर्कता लक्षात घेतली पाहिजे.

हवेत काेराेना, खाणार-पिणार कसे ?

काेराेनाचे कण हवेत राहतात, मग कार्यालयात मास्क काढून पाणी पिणे वा खाणे सुरक्षित अाहे का ? यावर अर्चना भारद्वाज आणि जीनोम सिक्वेन्सिंग तज्ज्ञ डॉ. तेज सौपती म्हणतात की, आपण सर्वच मास्क लावत अाहाेत आणि अंतर राखत आहोत. जर सर्वांनीच मास्क लावले असतील तर सक्रिय व्हायरस हवेतून कसा निघेल? बंदिस्त जागेत सामूहिक जेवण करू नये.
१५ दिवस सतर्कता, काेराेना हरणार

भारद्वाज म्हणाल्या, अाम्ही सामान्य माणसांप्रमाणेच कुुटुंबाला भेटताे. सतर्क राहून कार्यालय- प्रयाेगशाळेत काम करताे. प्रत्येक संशाेधन सांगते की, केवळ १५ दिवसांसाठी सर्व जणांनी याेग्य प्रकारे मास्क घाला. एकमेकांमध्ये अंतर ठेवा अाणि सॅनिटाइझ करत राहा. समारंभाला जाऊ नका. काेराेना काेणतीही लस किंवा अाैषधाशिवाय समाप्त हाेऊ शकताे.

शेवटी हे सर्व कसे जमले, तीन उदाहरणांनी समजून घ्या

पहिले |सीडीएफडी (सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंट अँड डायग्नोस्टिक) हा सीसीएमबीचा भाग आहे. संचालक प्रा. थांगराज यांनी भेटण्यासाठी चेंबरमध्ये नाही तर मीटिंग रूममध्ये बाेलावले. येथे पण तीन मीटर अंतरावर बैठक व्यवस्था केली अाहे. गेल्या १३ महिन्यांपासून १६ तास कार्यालयात काम करत अाहेत. पण काेराेनामुळे एखाद्या मीटिंगला नकार देत नाहीत.

दुसरे |शास्त्रज्ञ डाॅ. पूरनसिंह सिजवाली अाणि डाॅ. अर्चना भारद्वाज यांचे छायाचित्र घ्यायचे हाेते. जेव्हा दाेघांना पाच सेकंदांसाठी मास्क काढायला लावला तेव्हा त्यांनी अाधी केबिनचे दार उघडले. खेळती हवा सुरू झाल्यावर तीन मीटर दूरवर त्या उभ्या राहिल्या. म्हणाल्या, तुम्ही फाेटाे काढण्यासाठी तयार व्हा. नंतर पाच सेकंदांसाठी मास्क हटवला.

तिसरे| प्रत्येक लॅबच्या नियमाप्रमाणेच कँटीनच्या बाहेर जेवण्यासाठीही अलिखित नियम अाहेत. कँटीनमध्ये जेवणाची बंद पाकिटे दिली जातात. प्रत्येक टेबलमध्ये तीन मीटरचे अंतर अाहे. प्रत्येक टेबलाचा व्यास दाेन मीटर अाहे. त्यामुळे टेबलाच्या चारही बाजूला उभे असलेले लाेक एकमेकांपासून तीन फूट दूर राहतात. मग सर्व जेवण करतात.

बातम्या आणखी आहेत...