आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NEP 2020| What Is Academic Bank Of Credit (ABC); Functions Of ABC And Its Benefits| One Year Of New Education Policy; News And Live Updates

नवीन शिक्षण धोरण:विद्यार्थ्यांनी मधातच अभ्यास सोडल्यास वर्ष जाणार नाही वाया; अॅकेडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये सुरक्षित असणार प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नोंदी, जाणून घ्या काय आहे ABC आणि त्याचे फायदे?

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅकेडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे काय?

केंद्र सरकारने नवीन शिक्षण धोरण मंजूर करुन 1 वर्ष उलटले आहे. देशात 1986 नंतर म्हणजे 34 वर्षानंतर पहिल्यांदाच शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आले आहे. या नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यापर्यंत बरेच बदल केले गेले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी नवीन शिक्षण धोरणाच्या एक वर्षाच्या पार्श्वभूमीवर 'अॅकेडमिक बँक ऑफ क्रेडिट'ची सुरुवात केली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव आपला अभ्यासक्रम मधातच सोडवा लागला त्यांना यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे. कारण या योजनेमुळे त्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाहीये. त्यासोबतच अॅकेडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रत्येक नोंदी सुरक्षित राहणार आहे.

अॅकेडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे काय?
अॅकेडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे हे एक व्हर्च्युअल स्टोअर-हाऊस आहे, जे प्रत्येक विद्यार्थ्यांचा डेटा स्टोअर करणार आहे. यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांना अॅकेडमिक बँक ऑफ क्रेडिट योजनेत आपली नोंदणी करावी लागेल. त्यानंतरच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डेटा येथे स्टोअर होणार आहे. जर विद्यार्थ्यांना काही कारणास्तव आपला अभ्यासक्रम मधातच सोडवा लागता तर त्याचे वर्ष यामुळे वाया जाणार नाहीये. त्या विद्यार्थ्यांला कालावधीनुसार प्रमाणपत्र, डिप्लोमा किंवा पदवी दिली जाणार आहे. प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र, द्वितीय वर्ष उत्तीर्ण पदविका आणि तीन वर्षे किंवा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदवी प्रदान केली जाईल. हे व्यावसायिक बँकेसारखे कार्य असून यामध्ये विद्यार्थी ग्राहक असणार आहेत.

अॅकेडमिक बँक कसे कार्य करेल?
अॅकेडमिक बँकेत विद्यार्थ्यांचे खाते उघडले जाईल. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना एक विशेष आयडी आणि एसओपीचे पालन करावे लागेल. उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना ते घेत असलेल्या अभ्यासक्रमांचे क्रेडिट त्या अॅकेडमिक बँकेत जमा केले जाणार आहे.

एकाच संस्थेकडून सर्व क्रेडिट्स मिळतील का?
कोणत्याही संस्थेचा विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. परंतु, त्या संस्थेची यामध्ये नोंदणी असावी ही एकमेव अट आहे. कारण वेगवेगळ्या संस्थांमध्ये सर्वच अभ्यासक्रम नसतात. त्यामुळे कोणत्याही संस्थेस यात सहभागी होण्याची परवानगी आहे. अॅकेडमिक बँकेत जमा होणाऱ्या क्रेडिटच्या आधारे विद्यार्थ्याला प्रमाणपत्र, पदवी किंवा डिप्लोमा मिळणार आहे.

एकदा अभ्यासक्रम सोडल्यास पुन्हा प्रवेश कसा मिळवायचा?
ही योजना नवीन शैक्षणिक धोरण अधिक लवचिक बनविण्यासाठी आणली गेली आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना आपल्या मनानुसार अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. जर विद्यार्थ्यांजवळ एबीसीमध्ये जून्या नोंदी असतील तर त्यांना पुन्हा आपले अभ्यासक्रम सुरु करता येणार आहे.

स्टोअर क्रेडिट करण्यासाठी किती कालावधी असेल?
एबीसीमध्ये स्टोअर क्रेडिटचे जास्तीत जास्त शेल्फ लाइफ 7 वर्षाची आहे. त्यानंतर याचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येणार नाहीये. परंतु, जर संस्थेत वेगवेगळे नियम असल्यास विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.

एबीसीची कार्ये काय असतील?
एबीसी नोंदणीकृत संस्थेने दिलेले क्रेडिट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करेल. एबीसी यूजीसीने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे आणि निकषांनुसार क्रेडिट मान्य करणार आहे. परंतु, अॅकेडमिक बँक केवळ संस्थांना दिलेले क्रेडिटच स्विकारणार आहे.

कोणत्या अभ्यासक्रमाचा यात समावेश असेल?
या अॅकेडमिक बॅंकेत यूजीसी मान्यताप्राप्त उच्च संस्थेच्या अभ्यासक्रमासह अभियांत्रिकी, वैद्यकीय, दंत, कायदा आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. तथापि, यापैकी बरेच अभ्यासक्रम वेगवेगळ्या व्यावसायिक संस्थांद्वारे नियंत्रित केले जातील. क्रेडिट बँक योजनेसाठी त्यांची मंजुरी घेतली जाईल. त्याशिवाय स्वंयम, एनपीटीईएल, व्ही-लॅब किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही अभ्यासक्रमांसारख्या शासकीय ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर क्रेडिट्स ट्रान्सफर आणि साठवण्यासाठी विचार केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...