आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Nepal Border Firing News And Update; Firing From Nepal In Bihar, One Man Killed 3 Injured

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीननंतर आता नेपाळ बॉर्डरवर तनाव:नेपाळच्या सैनिकांनी बिहार बॉर्डरवरील शेतात काम करणाऱ्या लोकांवर केला गोळीबार; 1 मृत्यू तर 3 जखमी

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी झालेल्या घटनेनंतर तपास करताना अधिकारी. - Divya Marathi
शुक्रवारी झालेल्या घटनेनंतर तपास करताना अधिकारी.
  • बिहारच्या सीतामडीजवळ जानकीनगर बॉर्डरवर गोळीबार

भारत आणि नेपाळमध्ये सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान शुक्रवारी(ता.12) नेपाळकडून बिहारच्या जानकीनगर बॉर्डरवर फायरिंग करण्यात आली. या गोळीबारात एका भारतीयाचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. 

एसएसबीचे डीजी कुमार राजेश चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “नेपाळच्या सैनिकांनी 15 राउंड फायर केले. यातील 10 राउंड हवेत फायर करण्यात आले. यादरम्यान एक व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले.” सीतामडीजवळील बिहार सीमेवर गोळीबारात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी मारहाणीच्या घटना झालेल्या आहेत.

शेतात काम करत होते लोक

मिळालेल्या माहितीनुसार, घटना सीतामडीच्या सोनबरसा बॉर्डर परिसरातील जानकीनगर गावची आहे. येथे सीमेजवळ काही लोक शेतात काम करत होते. यादरम्यान नेपाळच्या सैनिकांकडून फायरिंग करण्यात आली. फायरिंगमध्ये जानकीनगर टोले लालबन्दी रहिवासी डिकेश कुमार(25) मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. यातील दोघे गंभीर आहेत. या सर्वांना सीतमगडीच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

भारत-नेपाळमध्ये सीमावाद सुरू आहे

भारत आणि नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून सीमावाद सुरू झाला आहे. 8 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिपूलेखवरुन धाराचूलापर्यंत बनवण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन केले. यानंतर नेपाळने लिहूलेखला आपला सांगत विरोध केला. 18 मे रोजी नेपाळने आपल्या देशाच्या नवीन नकाशात भारतातील लिपूलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानीला नेपाळमध्ये दाखवले. नेपाळ नव्या नकाशाला आपल्या संविधानात सामील करणार आहे. परंतू, भारताने याचा विरोद केला आहे.

बातम्या आणखी आहेत...