आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमधून बिहारमध्ये घुसलेल्या हत्तींची दहशत, VIDEO:पिकांची नासधूस; वाटेत जे आले ते तुडवले

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळमधून किशनगंजमध्ये दाखल झालेल्या वन्य हत्तींच्या कळपाने मंगळवारी हैदोस घातला. टेढागाछ प्रखंडातील बैरिया आणि आजूबाजूच्या ब्लॉकला लागून असलेल्या दोन गावांमध्ये हत्तींनी घरांचे नुकसान केले आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तीन हत्ती गावातील मका पीक नष्ट करत असल्याचे दिसून येते.

पहिल्या फोटोंध्ये पाहा हत्तींचा धुमाकूळ

ग्रामस्थांनी वनविभागावर नाराजी व्यक्त केली
ग्रामस्थ सांगतात- माहिती देऊनही वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी आजतागायत येथे पोहोचले नाहीत. आम्ही घाबरलो आहोत, घराबाहेरही पडू शकत नाही. हत्ती कुणाला तरी मारेल अशी भीती आहे.

वनविभागाचे अधिकारी काय म्हणतात?
वन परिक्षेत्र अधिकारी उमानाथ दुबे यांनी दैनिक भास्करला सांगितले की, वनविभागाच्या पथकाने हत्तींचे लोकेशन ट्रेस केले आहे. तीन हत्ती सध्या भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या चिचुवाबारी येथील जंगलात असून ते सध्या शांत आहेत. दोन ते तीन गावांचे नुकसान झाले आहे. पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई दिली जाईल.

हत्तीपासून बचावासाठी ड्रायव्हरने रिव्हर्समध्ये पळवली बस VIDEO

हत्ती हा जंगलातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. मात्र, हत्तीला राग आला तर त्यापेक्षा वाईट कोणीही नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका बससमोर हत्ती आल्याने ड्रायव्हरने रिव्हर्समध्ये बस मागे घेतल्याचे दिसून येते. मंगळवारी चालकुडी येथील वालपराई रस्त्यावर एक जंगली हत्ती प्रवासी बससमोर आला आणि बसच्या दिशेने येऊ लागला. अशा परिस्थितीत चालकाने 40 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी रिव्हर्स गियरमध्ये बस 8 किमी मागे घेतली. यादरम्यान बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी व्हिडीओही बनवला. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...