आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:नेपाळ चीनच्या वाटेवर; सीमेवर उतरवले लष्कर, भारतीय हद्दीतील भूभाग बळकावला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेपाळच्या कुरापती, भारताचे जलप्रवाह अडवले

बिहार-नेपाळ सीमेवरून दिग्विजयकुमार/ अतुल उपाध्याय

भारतीय सीमेवर नेपाळही चीनसारख्या कुरापती करू लागला आहे. बिहारच्या वाल्मीकनगरमध्ये सुस्ता भाग नेपाळने ताब्यात घेतला असून भारतीयांना या भागात बंदी घातली आहे. या भागात ७,१०० एकर जमिनीचा वाद असून आता नरसही जंगलावरही नेपाळने दावा सांगितला आहे. कोरोनाचे क्वॉरंटाइन सेंटर उघडण्याच्या नावाखाली नेपाळने आपले लष्कर या भागात आणले आहे.

मधुबनीच्या मधवापूरला लागून असलेल्या मटिहानीजवळ नेपाळी लष्कराच्या हालचाली सुरू आहेत. महादेवा गावानजीक तैनात एका जवानानुसार, काही दिवसांपुरती ही तैनाती आहे. दरम्यान, नेपाळ-भारत सीमेवरून बिहारला नेहमीच पुराचा धोका असतो. दरवर्षी यासाठी नेपाळमध्ये उपाययोजना केल्या जातात. यंदा मात्र नेपाळने आक्षेप घेतल्याने बिहारमध्ये पुराचा धोका आहे.

नेपाळच्या कुरापती, भारताचे जलप्रवाह अडवले

नरकटियागंज भागात भिखनाठोडीमध्ये येणाऱ्या दोन जलप्रवाहांना नेपाळने अडवले आहे. नेपाळ भारतीय चौक्यांना होणारा पाणीपुरवठा थांबवू पाहत आहे. मात्र, प्रत्यक्षात या चौक्यांना बोअरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो.

- गंडक नदीच्या भारतीय बाजूच्या किनाऱ्यावर सुस्ता गावात पूल बांधकाम सुरू केले. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर हे काम नेपाळने थांबवले आहे.

- जूनच्या प्रारंभी वाल्मीकीनगर भागात त्रिवेणी घाटाजवळ एका बंधाऱ्यास नेपाळने विरोध केला होता. भारताने खडसावल्यावर सध्या नेपाळ शांत आहे.

नेपाळ सीमेवर चिनी तंबूत नेपाळी जवान

बिहार सीमेवर जागोजागी चिनी तंबूत नेपाळचे सशस्त्र जवान दिसत आहेत. असे सुमारे ४०० तंबू येथे उभारण्यात आले आहेत.

- बिहारमध्ये नेपाळला कधीच परके मानले जात नाही. सीमेवरून सहज वाहतूक होते. परंतु आता सीमेवर प्रत्येक १०० मीटरवर नेपाळी जवान तैनात आहेत.

- १७५१ किमी लांबीच्या सीमेवर नेपाळच्या सशस्त्र दलांनी २२० नव्या चौक्या उभारण्याची तयारी सुरू केली.

- नेपाळने भिट्ठामोड भागात भारताने सुरू केलेल्या अॅप्रोच रोडवर आक्षेप घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...