आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Nepal Parliament Special Session To Discuss And Vote On New Map Which Covers Indian Territor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमा वाद:नेपाळने भारताचा भूभाग स्वत:च्या नकाशात दाखवला, नव्या नकाशाला नेपाळ संसदेनेही दिली मंजुरी

काठमांडू/नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • या नकाशामध्ये लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपुलेख हे तीन विभाग नेपाळचे असल्याचा दावा

भारताचा काही भूभाग समाविष्ट असलेल्या आपल्या देशाच्या नव्या नकाशाला नेपाळ संसदेने मंजुरी दिली आहे. ही घटनात्मक दुरुस्ती संसदेत मंजूर करण्यात आली. या नकाशामध्ये भारताचा काही धाेरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा भाग नेपाळचा असल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याने सीमेवरून आता नेपाळने नव्या वादाला ताेंड फाेडले आहे.

मतदानाच्या वेळी संसदेतील विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेस, राष्ट्रीय जनता पार्टी-नेपाळ आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने घटनेच्या तिसऱ्या अनुसूची बदलासंदर्भात सरकारने मांडलेल्या विधेयकाला पाठिंबा दिला. सर्व २५८ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले. नेपाळच्या शिष्टमंडळाने या घटनादुरुस्तीस यापूर्वीच मान्यता दिली होती. नेपाळने या नकाशामध्ये लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपुलेख हे तीन विभाग नेपाळचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा नकाशा अयाेग्य असल्याचे सांगत भारताने २० मे राेजी हा नकाशा फेटाळून लावला हाेता. शुक्रवारी बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील सीमेवर नेपाळच्या जवानांनी भारतीयांवर गोळीबार केला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...