आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Nepal Police Fired Shots At Three Indians Near The Kishanganj Border In Bihar, Injuring One Seriously

भारत-नेपाळ सीमा वाद:नेपाळ पोलिसांनी बिहारच्या किशनगंज बॉर्डरजवळ तीन भारतीयांवर झाडल्या गोळ्या, एक गंभीर जखमी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळ पोलिसांनी परत एकदा भारतीय नागरिकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. बिहारच्या किशनगंजमध्ये भारत-नेपाळ सीमेजवळ नेपाळ पोलिसांनी तीन भारतीयांवर फायरिंग केली. या गोळीबारात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत एसपी कुमार आशीष यांनी सांगितले की, नेपाळ पोलिसांनी शनिवारी रात्री फायरिंग केली. यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झालेल्या लोकांनी सांगितले की, ते आपल्या गुरांना शोधण्यासाठी सीमेजवळ गेले होते, त्यावेळी त्यांच्यावर फायरिंग करण्यात आली. आम्ही नेपाळ पोलिसांशी चर्चा केली आहे, प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करत आहोत.

बिहारच्या जानकीनगर बॉर्डरवर फायरिंग करण्यात आली होती यापूर्वी 12 जूनला नेपाळकडून बिहारच्या जानकीनगर बॉर्डरवर फायरिंग करण्यात आली होती. यात एका भारतीयाचा मृत्यू झाला होता तर तिघे जखमी झाले होते. जानकीनगर बिहारच्या सीतामडी जिल्ह्यात आहे. येथे भारताचे सशस्त्र सीमा दल (एसएसबी) तैनात आहे. परंतू, याप्रकरणी डीजी कुमार राजेश चंद्रा यांनी ही घटना आपापसातील वादामुळे झाल्याचे सांगितले.