आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Nepal's Rs 1,300 Crore Worth Goods Seized By China; India's Only Basis For Return

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाच्या नावाने दगाफटका:नेपाळच्या 1300 कोटींच्या वस्तू चीनने रोखल्या; परतीसाठी भारताचाच आधार

काठमांडू / परशुराम काफ्लेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनने तिबेटमध्ये 1200 कंटेनर अडवले

नेपाळ व चीनच्या मैत्रीत कटुता येत आहे. कारण, नेपाळहून येणाऱ्या वस्तूंवर चीनने कोरोनाचा आधार घेत अघोषित बंदी घातली आहे. गत १० महिन्यांपासून तिबेट सीमेवर नेपाळचे १२०० कंटेनर अडकलेले आहेत. या मालाची किंमत १३०० कोटींहून जास्त असल्याचे नेपाळी व्यापारी सांगतात. दरम्यान, अशा स्थितीमुळे कर्ज फेडू न शकल्याने नेपाळी व्यापारी राम पौडेल यांनी आत्महत्या केली आहे.

रसुवागडी-केरुंग व टाटोपानी-खासा सीमेवरून होतो व्यापार व्यापाराच्या दृष्टाने चीनसोबत नेपाळचे रसुवागडी-केरुंग आणि टाटोपानी-खासा हे सीमेवरील दोन मुख्य केंद्रे आहेत. २०१५ मध्ये आलेल्या भूकंपामुळे हे बंद होते. मात्र, गतवर्षी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दौऱ्यानंतर ही सीमा खुली करण्यात आली होती. केरुंग-रसुवागडी सीमा चीनने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने विकसित केली आहे. चीनकडून केरुंगमार्गे नेपाळकडे जाण्यास केवळ ५ आणि टाटोपानी-खासामार्गे २ कंटेनरला परवानगी दिली जात आहे. आधी दरदिवसाला ३० ते ४० कंटेनरने माल येत होता. चीनने नेपाळ-चीनदरम्यान १३ सीमा खुल्या करण्याबाबत सहमती दर्शवली होती. मात्र यातील दोन सीमांवर आयात/निर्यातीची प्रक्रिया खडतर आहे. रसुवागडीमध्ये तैनात नेपाळी अधिकारी पुण्य विक्रम खडके सांगतात की, मोठ्या व्यापाऱ्यांनी चीनमधील शहरांतून माल भारतातील कोलकात बंदरावर पाठवला आहे.

कोलकाता बंदरावरून वस्तू ३५ दिवसांत चीनवरून नेपाळला येऊ शकतात. यावर्षी ४ बिलियन नेपाळी रुपयात महसूल मिळेल, अशी आशा होती. मात्र अद्याप आम्ही १ बिलियनपर्यंतही पोहोचू शकलेलो नाही. टाटोपानी सीमेवरील कस्टम अधिकारी लालबहादूर खत्री सांगतात, या रस्त्याने गेलेले सुमारे ८०० कंटेनर्स तिबेटमध्ये अडकेले आहेत. चीनचे अधिकारी कोरोनाचे कारण पुढे कर कंटेनर पुढे पाठवण्यास नकार देत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser