आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वेकडील दोन राज्यांत मंगळवारी शपथविधी सोहळा पार पडला:नेफ्यू रियो, कॉनरॅड संगमा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ

काेहिमा/शिलाँग18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वेकडील दोन राज्यांत मंगळवारी शपथविधी सोहळा पार पडला. नागालँडमध्ये नेफ्यू रियो आणि मेघालयात कॉनरॅड संगमा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. नागालँडमध्ये नेफ्यू रियो पाचव्यांदा तर मेघालयमध्ये कॉनरॅड संगमा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.

शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आदी उपस्थित होते. मेघालयात एनपीपी-भाजपची युती आहे, तर नागालँडमध्ये एनडीपीपीसह भाजपने सरकार स्थापन केले आहे. दोन्ही राज्यांत दोन उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहेत. नागालँडमध्ये मुख्यमंत्री रियो यांच्याशिवाय तदितुई रंगकाउ जेलियांग आणि यांथुंगो पॅटन यांनी नागालँडचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. इतर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात जी काइतो आये, जेकब झिमोमी, केजी केन्ये, तेमजेन इम्ना अलोंग आणि नागालँडच्या पहिल्या महिला आमदारांपैकी एक सालहूतुओनुओ क्रूज यांचा समावेश आहे. मेघालयात एनपीपीचे स्निआवभलंग धर आणि प्रिस्टोन तेनसोंग यांनी उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. राज्यपाल फागू चौहान यांनी संगमा यांच्यासह १२ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यातील ८ आमदार एनपीपीचे, २ यूडीपीचे आणि प्रत्येकी १-१ आमदार भाजप, एचएसपीडीपीचे आहेत. भाजपने अॅलेक्झेंडर लालू हेक यांना मंत्री बनवले आहे.

बातम्या आणखी आहेत...