आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानीट यूजीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या वर्षी एनटीएने परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. पहिल्यांदाच पेपर चार भागांत विभागला आहे. बायोलॉजी आणि झूलॉजीचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. या वेळी १८० ऐवजी २०० प्रश्न असतील. फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी आणि बॉटनी दोन सेक्शनमध्ये विभागले गेले. पहिले ३५ प्रश्न अनिवार्य असतील. दुसऱ्यात १५ प्रश्न असतील. यापैकी १० सोडवावेच लागतील. अशाच प्रकारे २०० पैकी १८० प्रश्न सोडवणे अनिवार्य करण्यात आले आहे. जास्तीत जास्त गुण मागील वर्षीप्रमाणेच ७२० असतील. प्रत्येक प्रश्न ४ गुणांचा असेल, तर चुकीच्या उत्तरासाठी एका गुणाची कपात केली जाईल.
याशिवाय नीट यूजी अर्ज प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. दोन टप्प्यांत अर्ज भरावा लागेल. पहिल्या टप्प्यात शैक्षणिक पात्रता आणि पत्त्यासह अन्य प्राथमिक माहिती द्यावी लागेल. पासपोर्ट आणि पोस्टकार्ड साइझचे एक-एक फोटो लागतील. डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.
करिअर काउन्सेलिंग एक्स्पर्ट पारिजात मिश्रा यांनी सांगितले की, अर्ज ६ ऑगस्ट रोजी रात्री ११.५० पर्यंत भरले जाऊ शकतील. ८ ते १२ ऑगस्टदरम्यान अर्जात सुधारणा करता येईल. २० ऑगस्ट रोजी परीक्षा केंद्र जाहीर केले जातील. दुसऱ्या टप्प्यातील अर्जांची तारीख नंतर जाहीर केली जाईल. परीक्षा १३ सप्टेंबरच्या दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत देशातील १९८ शहरांत घेतली जाईल. यात १७ ते १८ लाख विद्यार्थी सहभागी होण्याचा अंदाज आहे. या वेळी पंजाबी आणि मल्याळम या नव्या भाषांसह १३ भाषांमध्ये प्रवेश परीक्षा होईल. यात इंग्रजी, मराठी, आसामी, बांगला, गुजराती, कानडी, मल्याळम, उडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू भाषांचा समावेश आहे. यंदा पंजाबी आणि मल्याळम या दोन नव्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या वेळेस पहिल्यांदाच कुवेतमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.
नीट पीजी प्रवेश परीक्षा ११ सप्टेंबर रोजी
नीट पीजी प्रवेश परीक्षेची तारीख मंगळवारी जाहीर करण्यात आली. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले की, नीट पीजी २०२१ ची परीक्षा ११ सप्टेंबरला होईल. पूर्वी ही परीक्षा १८ एप्रिल रोजी प्रस्तावित होती. २२ जुलै रोजी एम्स आपली आयएनआयसीईटी प्रवेश परीक्षा आयोजित करेल. याअंतर्गत एम्स नवी दिल्ली आणि इतर एम्स पीजीआयएमईआय चंदीगड, जिपमेर पुद्दुचेरी तथा निमहेन्स बंगळुरूमध्ये एमडी-एमएसमध्ये प्रवेश दिला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.