आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • New Aircraft In The Air Force After 23 Years Of Sukhoi ; Those Who Challenge Us Should Be Careful: Defense Minister

राष्ट्राचा चौकीदार:सुखाेईच्या 23 वर्षांनी वायुदलात नवे विमान; आम्हाला ललकारणाऱ्यांनी काळजी करावी : संरक्षणमंत्री

अंबाला3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लढाऊ शक्तिशाली राफेल भारतीय हवाई दलात समाविष्ट

सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक राफेल बुधवारी भारतीय वायुदलात समाविष्ट झाली. सुखाेईच्या २३ वर्षांनंतर वायुदलात नवीन लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. फ्रान्सहून आलेली ५ राफेल विमाने दुपारी ३.१० ला अंबालात उतरली. ग्रुप कॅप्टन हरकिरत सिंह यांच्या नेतृत्वात पायलटांनी खास धावपट्टीवर लँडिंग केले. लडाखमध्ये चीनविरुद्ध तणाव सुरू असताना राफेल विमाने डेरेदाखल झाली आहेत. राफेलला या आघाडीवर तैनात केले जाऊ शकते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘लष्करी इतिहासात ही नव्या युगाची नांदी आहे. आमच्याकडे वाकडी नजर टाकणाऱ्यांनी स्वत:ची काळजी करावी.’

सुखोईच्या सुरक्षेत आले राफेल : गाेल्डन अॅराे स्क्वॉड्रनमध्ये समाविष्ट

राफेल अंबालातील वायुदलाची १७ वी स्क्वॉड्रन गाेल्डन अॅरोचा भाग बनले आहेत. ५ राफेलमध्ये ३ विमाने एक सीट, तर दोन विमाने डबल सीटर आहेत. गाेल्डन अॅराेमध्ये १८ राफेल तैनात होतील. यात तीन ट्रेनर आणि उर्वरित १५ लढाऊ विमाने असतील. भारतीय वायुदलासाठी विमानांच्या ४२ स्क्वाॅड्रन मंजूर करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट

राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो, दृष्टो नैव च नैव च। नभः स्पृशं दीप्तम्...स्वागतम्!' - नरेंद्र माेदी, पंतप्रधान अर्थ- राष्ट्ररक्षणासारखे कोणतेही पुण्य, कोणतेही व्रत, कोणताही यज्ञ दिसत नाही

काँग्रेसकडून वायुदलाचे अभिनंदन

काँग्रेसने म्हटले की,‘शूर याेद्ध्यांचे अभिनंदन. आज प्रत्येक देशभक्ताने नक्की विचारावे की, ५२६ कोटींचे एक राफेल १६७० कोटी रुपयांत का? १२६ राफेलएवेजी ३६ का?’ काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत राफेल करारात भ्रष्टाचाराचा आराेप करत सरकारची कोंडी केली होती. भाजपने ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेद्वारे त्याला प्रत्युत्तर दिले होते.