आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Coronavirus Variant In India | Corona Cases In India, Coronavirus Outbreak In India, Corona Second Wave, Corona Varient B.1.1.28.2

भारतात आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट:ब्रिटेन आणि ब्राझीलवरुन आलेल्या नागरिकांमध्ये आढळला कोरोनाचा नवीन B.1.1.28.2 स्ट्रेन

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुग्णाचे वजन कमी करण्यासह फुफ्फुसांवर हल्ला करतो नवीन व्हेरिएंट

भारतात कोरोना आटोक्यात येत असतानाच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) ला कोरोना व्हायरसच्या जिनोम सीक्वेंसिंगमध्ये नवीन व्हेरिएंट आढळला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हा व्हेरिएंट ब्रिटेन आणि ब्राझीलवरुन भारतात आलेल्या नागरिकांमध्ये आढळला आहे. इंस्टीट्यूटने या नवीन व्हेरिएंटला B.1.1.28.2 नाव दिले आहे. हा भारतात आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे धोकादायक आहे. हा व्हेरिएंट आढळलेल्या लोकांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसत आहेत.

व्हॅक्सीनसाठी स्‍क्रीनिंग गरजेची

व्हेरिएंटच्या अभ्यासानंतर समोर आले की, हा व्हेरिएंट लोकांना गंभीर आजारी करू शकतो. या व्हेरिएंटविरोधात सध्या उपलब्ध असलेल्या व्हॅक्सीन परिणामकारक आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी स्‍क्रीनिंग गरजेची आहे. NIV ची ही स्‍टडी bioRxiv मध्ये ऑनलाइन पब्लिश झाली आहे.

दरम्यान, याच इंस्टीट्यूटच्या अजून एका स्‍टडीमध्ये सांगण्यात आले आहे की, स्वदेशी कोरोना व्हॅक्सीन ''कोव्हॅक्सिन'' या नवीन व्हेरिएंटविरोधात परिणामकारक आहे. तसेच, कोव्हॅक्सिनच्या दोन डोसद्वारे जी अँटीबॉडी तयार होते, त्यातून या व्हेरिएंटला नष्ट करता येते.

रुग्णाचे वजन कमी करण्यासह फुफ्फुसांवर हल्ला करतो नवीन व्हेरिएंट
आरोग्य जानकारांचे म्हणने आहे की, B.1.1.28.2 व्हेरिएंटची लागण झाल्यावर माणसाचे वजन कमी होते आणि फुफ्फुस खराब होतात. हा व्हेरिएंट फुफ्सांमध्ये जखमा करुन मोठे नुकसान करू शकतो. या अभ्यासात कोविडच्या जीनोम सर्विलांसच्या आवश्यकतेवर भर दिला आहे.

आतापर्यंत 10 लॅब्समध्ये 30 हजार सँपल्‍स सीक्‍वेंस झाले

जीनोम सीक्‍वेंसिंग लँब्‍स अशा म्‍यूटेंट्सचा शोध घेत आहे, जो कोरोना संक्रमणात अचानक येणाऱ्या वाढीचे कारण बनत आहे. सध्या इंडियन सार्स-कोव-2 जीनोम सीक्वेंसिंग कंसोर्टिया (INSACOG) अंतर्गत 10 नॅशनल लॅब्‍सने 30 हजार सँपल्‍स सीक्‍वेंस केले आहेत. केंद्र सरकारदेखील जीनोम सीक्‍वेंसिंगसाठी संसाधनांच्या वाढीवर भर देत आहे.

डेल्टा स्ट्रेनमुळे वाढली दुसरी लाट

डेल्टा किंवा B.1.617 व्हेरिएंट, ज्याला डबल म्यूटेंट स्ट्रेनदेखील म्हटले जाते, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये मोठ्या संख्येने आढळला आहे. यामुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण मोठ्या संख्येने आढळले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जीनोम सिक्वेसिंग केलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांमध्ये B.1.617 व्हेरिएंट मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...