आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतकऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरू होते. ‘प्रत्येक घरातील एक व्यक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाईल, असा निरोप पंजाब व हरियाणाच्या पंचायतींतून दिला जात आहे,’ असा दावा सोमवारी शेतकरी संघटनांनी केला. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत म्हणाले, ‘काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. कित्येक वर्षांपर्यंत एमएसपीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ करणारे हेच ते लोक आहेत. ’ त्यावर शेतकरी नेते योगेंद्र यादव म्हणाले, ‘आम्हाला कुणी फूस लावलेली नाही. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित नाही.’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी फोन करून शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. पण आधी बुराडीत रोखलेल्या शेतकऱ्यांना सिंघू सीमेवर येऊ द्या, अशी अट त्यांनी ठेवली.
टिकरी सीमेजवळ निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू, मृतदेह घेण्यास नातेवाइकांचा नकारबहादूरगड | टिकरी सीमेजवळ गजन सिंह (५५) या शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ते २६ नोव्हेंबरला पोलिसांनी फवारलेल्या पाण्याच्या फवाऱ्यांमुळे आजारी पडले होते. ही हत्या आहे, असा आरोप त्यांच्या पुतण्याने केला. हत्येचा गुन्हा दाखल होत नाही तोवर मृतदेह घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला आहे.
हरियाणातील १३० खाप पंचायतीही आजपासून शेतकरी आंदोलनात सहभागी होतील
१३० खाप पंचायतींचे प्रवक्ता जगबीर मलिक म्हणाले, ‘खापचे सर्व सदस्य आधी शेतकरी आहेत, मग नेते. आम्ही एकमताने आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.’ २०१४ च्या हरियाणा निवडणुकीत मोदींनी खाप पंचायतींचा आशीर्वाद मागितला होता, यावरून त्यांचे महत्त्व लक्षात येते.
आता पुढे ...... दिल्लीमध्ये संघर्ष चिघळण्याची शक्यता, दोन्हीकडून तयारी
- शेतकऱ्यांनी हरियाणा सीमेसह जयपूर, गाझियाबाद, मथुरा, सोनिपत, रोहतक सीमा बंद करण्याची घोषणा केली आहे. याबाबत रणनीती आखत होते.
- पोलिसांनी सिंघू सीमा सील केली आहे. यूपीतील शेतकरी येऊ नयेत म्हणून गाझियाबाद सीमेवर बॅरिकेड लावले. दिल्लीत येणाऱ्या रस्त्यांवर केंद्रीय दल तैनात आहे
- गृहमंत्री अमित शहा व कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यात बैठका झाल्या. अमित शहा मंगळवारी शेतकरी नेत्यांशी चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.
- आरएलपीचे प्रमुख हनुमान बेनीवाल यांनी एनडीएतून बाहेर पडण्याची धमकी दिली. असे झाल्यास शेतकरी मुद्द्यावरून एनडीए सोडणारा दुसरा पक्ष असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.