आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

भूकंप:दिल्ली-एनसीआरमध्ये 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, दोन महिन्यात पाचव्यांदा दिल्ली भूकंपाने हादरली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागच्या महिन्यात 12 आणि 13 एप्रिलला, या महिन्यात 10 आणि 15 मे रोजी भूकंप आला होता

दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारी रात्री 9.8 मिनीटांवर भूकंपाचे झटके जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सायमोलॉजी (भूकंप विज्ञान) ने रिश्टर स्केलवर तीव्रता 4.6 मॅग्नीट्यूड असल्याचे सांगितले. भूकंपाचे केंद्र हरियाणाच्या रोहतकमध्ये जमिनीपासून 3.4 किलोमीटर आत होते. दोन महीन्यात दिल्ली-एनसीआरमध्ये पाचव्यांदा भूकंप आला आहे.

यापूर्वी 12 एप्रिलला 3.5, 13 एप्रिलला 2.7, 10 मे रोजी 3.5 आणि 15 मे रोजी 2.2 तीव्रतेचा भूकंप आला होता.

दिल्ली-एनसीआरमध्ये तीन फॉल्ट लाइन

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये तीन फॉल्ट लाइन आहेत. जिथे फॉल्ट लाइन असतात, तिथे भूकंपाचे एपिसेंटर बनते. दिल्ली-एनसीआरमध्ये जमिनीत दिल्ली-मुरादाबाद फॉल्ट लाइन, मथुरा फॉल्ट लाइन आणि सोहना फॉल्ट लाइन आहेत.

0