आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राजधानीत 14 लाख रुपयांइतकी 13802 तासांची दररोज होणार बचत, 921 टन दरवर्षी कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जनही थांबणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शास्त्री पार्क आणि सिलमपूर चौक उड्डाणपूल ऑगस्टअखेरपर्यंत होणार सुरू

राजधानी नवी दिल्लीतील शास्त्री पार्क चौरस्ता व सिलमपूर चौकात दररोजच्या रस्ते वाहतुकीपासून सुटका होण्यासाठी बांधण्यात आलेले दोन उड्डाणपूल जनतेसाठी ऑगस्टअखेरपर्यंत सुरू होणार आहेत. दोन्ही उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अभ्यासानुसार, सुमारे २.५ किलोमीटर अंतर कापण्यासाठी जनतेचा ४.२ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या प्रकल्पाची किंमत चार वर्षांत वसूल होईल. शास्त्री पार्क चौरस्त्यावर बांधलेल्या उड्डाणपुलावरील लूपचे काम सुरू आहे. या दोन्ही लूपला उड्डाणपुलास जोडल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल. आता दोन्ही लूप जोडण्याचे काम सुरू करण्यासाठी पुलाखालील वाहतूक बंद करणार आहेत. ९२१ टन दरवर्षी कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन होणार कमीअभ्यासानुसार, उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्याने ताशी ०.११ टन कार्बन डायऑक्साइड (सीओ-२)चे उर्त्सजन घटेल. वर्षात सुमारे ९२१ टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होईल. यामुळे दिल्लीत प्रदूषण घटेल. एका वर्षात एक झाड २२ किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो.

असा हा प्रकल्प : शास्त्री पार्क ते सिलमपूरपर्यंत ६ पदरी दुहेरी मार्गाचा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. याची लांबी ७०० मीटर आहे. यावर दोन लूप आहेत. एका लूपने खजुरीहून येणारी वाहतूक उड्डाणपुलांवर जाईल. तेथून काश्मिरीगेटला जाणे सोपे होईल, तर गांधीनगरकडून येणाऱ्यांना शहादरा जाणे साेपे होईल. याशिवाय सिलमपूर चौक तयार झाल्यानंतर दोनपदरी १२०० मीटरचे वनवे उड्डाणपूल दुहेरी तयार करण्यात आला आहे.

जनतेच्या १३८०२ तासांची रोज होणार बचत: पीडब्ल्यूडीने वर्ष २०१९ मध्ये शास्त्री पार्कहून सिलमपूरला जाणाऱ्या वाहनांचा अभ्यास केला. त्यानुसार जनतेचे सुमारे १३८०२ तास वाचतील. मूल्यात दिल्लीच्या प्रती व्यक्ती उत्पन्नानुसार सुमारे १४ लाख रुपयाइतकी आहे.२६२५ लिटर दररोज इंधनाची बचतअभ्यासात पेट्रोल व डिझेलच्या वाहनांच्या इंधनाची वेगवेगळी मोजणी केली. त्यानुसार रस्त्यावर प्रती तास ४१९१ वाहने धावण्यास आधार मानून इंधनाच्या बचतीच्या अंदाज काढला. अभ्यासानुसार, प्रकल्प सुरू होण्याने एका दिवसाला सुमारे २६२५ लिटर इंधनाची बचत होईल.त्यानुसार दररोज ३ लाख १५ हजार व प्रती वर्ष ११ कोटी ४९ लाख रुपये इंधनाची बचत होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...