आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Delhi Unlock 6 Permission To Open Stadiums And Sports Complexes With Conditions

दिल्लीमध्ये अनलॉक-6:स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अटींसह उघडण्यास परवानगी, शाळा-कॉलेज बंदच राहणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीमध्ये रविवार अनलॉक -6 ची गाईडलाईन जारी करण्यात आली. यासोबतच विना दर्शकांचे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आलाय आहे. थिएटर, मल्टीप्लेक्स, बँक्वेट हॉल, ऑडिटोरियरम आणि शाळा-कॉलेज बंदच राहतील. सामाजिक आणि राजकीय मेळावे होणार नाहीत. यापूर्वी दिल्लीत जिम आणि योग सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती.

दिल्लीमध्ये या गोष्टींना सूट
1.
योगा सेंटर आणि जिम 50% क्षमते उघडण्यास परवानगी.
2. लग्न समारंभात 50 लोकांना परवानगी.
3. सरकारी ऑफिस, ऑटोनॉमस बॉडी, पीयूसी आणि कॉर्पोरेशन 100% स्टाफने उघडले जाऊ शकतील.
4. प्रायव्हेट ऑफिस सकाळी 9 ते 5 पर्यंत 50% स्टाफने उघडले जाऊ शकतात.
5. दुकाने, रेसिडेंस कम्प्लेक्स, किराणा दुकाने 10 ते रात्री 8 पर्यंत उघडण्यास परवानगी.
6. परवानगी असलेले आठवडी बाजार 50% क्षमतेने सुरु करता येतील/
7. स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स.

या गोष्टींवर संध्या बंदी
1.
स्कूल, कॉलेज, शिक्षण संस्था, ट्रेनिंग सेंटर, कोचिंग इंस्टीट्यूट
2. सामाजिक, राजकीय, स्पोर्ट्स, मनोरंजन, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम
3. स्विमिंग पूल, सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स, ऑडिटोरियम, असेंबली

मागील आठवड्यात केली होती अनलॉक 5 ची घोषणा
यापूर्वी 27 जूनला अनलॉक-5 ची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा जिम आणि योगा सेंटर 50% क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. 21 जूनला अनलॉक-4 ची घोषणा करण्यात आली होती. तेव्हा पार्क आणि बार 50% क्षमतेने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...