आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • New Directions Issued: Complete List Of What's Open And What's In Madhya Pradesh Rajasthan Chhattisgarh Haryana Uttar Pradesh Punjab Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन 2.0:नवीन गाइडलाइन जारीः 20 एप्रिलपासून काही सेवांना सूट तर काहींवर निर्बंध कायम; काय उघडणार आणि काय बंद जाणून घ्या A To Z

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • आवश्य सेवा आणि वस्तू पुरवठा करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्या.

देशभरात आजपासून लॉकडाउनचा दुसरा फेज सुरू झाला आहे. 3 मे पर्यंत सुरू राहणाऱ्या या लॉकडाउनमध्ये सरकारने बुधवारी काही महत्वाचे दिशा-निर्देश जारी केले आहेत. यामध्ये सांगण्यात आले आहे की आपण काय करू शकतो आणि काय नाही. अर्थात कोणत्या गोष्टींना सूट देण्यात आली आणि कोणत्या गोष्टी अजुनही बंद राहतील हे गाइडलाइनमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. सोबतच, काही गोष्टींच्या बाबतीत दिलेली सूट कोणत्या नियमांच्या आधारे राहील हे देखील सांगण्यात आले आहे. या सेवा आणि वस्तूंच्या कामकाजावर असलेली सूट 5 दिवसांनंतर म्हणजेच 20 एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. त्यातही नियमांची अवहेलना केल्यास सर्व प्रकारच्या सूट रद्द केल्या जातील. जाणून घ्या, कोणत्या बाबतीत मिळेल सूट आणि कोणत्या गोष्टी राहतील यापुढे सुद्धा बंद...

20 एप्रिलपासून दुकाने उघडतील, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल

 • आवश्य सेवा आणि वस्तू पुरवठा करणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्या.
 • आवश्य साहित्य विक्री करणारी दुकाने आणि रॅशनची दुकाने
 • फळ-भाजीपालाचे गाडे, साफ-सफाईचे साहित्य विक्री करणारी दुकाने
 • डेअरी आणि मिल्क बूथ, चिकन, मटण आणि मासे यासोबत चारा विक्रीची दुकाने
 • जिल्हा प्रशासनाची जबाबदारी राहील की त्यांनी सर्वच सेवा आणि वस्तूंची होम डिलिव्हरी करण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून दुकानांवर गर्दी होणार नाही.

या आवश्यक सेवा मिळत राहतील

 • बँका, एटीएम खुले राहतील. कॅपिटल आणि डेबिट मार्केट सेबीच्या निर्देशानुसार काम करतील.
 • मनरेगा अंतर्गत मजूरांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना काम करण्याची परवानगी
 • पेट्रोल, डीझेल, केरोसीन, सीएनजी, एलपीजी आणि पीएनजी पुरवठा सुरू राहील.
 • पोस्ट ऑफिस खुले राहतील. पोस्टल सेवा जारी राहील.
 • आयटी सेवा सुद्धा सुरळीत सुरू राहतील.

क्लिनिक उघडणार, मेडिकल सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील

 • हॉस्पीटल, नर्सिंग होम, क्लिनिक, टेलिमेडिसिन सेवा सुरू राहतील.
 • डिस्पेंसरी, केमिस्ट, फार्मसी, जन औषध केंद्रांसह सर्व प्रकारची मेडिकल इक्विपमेंटची दुकाने सुरू राहतील.
 • मेडिकल लॅब आणि कलेक्शन सेंटर.
 • फार्मा आणि मेडिकल रिसर्च लॅब, कोरोनाशी संबंधित रिसर्च करणाऱ्या संस्था.
 • वेटरनरी हॉस्पीटल, डिस्पेंसरी क्लिनिक, पॅथोलॉजी लॅब, लस आणि औषधांची विक्री.
 • कोरोनासंबंधित सर्वत अधिकृत खासगी संस्था, होम केयर, डायग्नोस्टिक आणि हॉस्पीटलसाठी काण करणाऱ्या संस्था.
 • औषध, फार्मा, मेडिकल डिवाइस, मेडिकल ऑक्सीजन, त्यासंबंधित पॅकेजिंग मटेरियल आणि रॉ मटेरियल बनवणारे मॅन्यूफॅक्चरिंग यूनिट्स.
 • अँबुलेंससह मेडिकल, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण.
 • सर्व मेडिकल, वेटरनरी सेवेशी निगडीत लोक, सायंटिस्ट, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, लॅब टेक्नीशियन, मिड वाइव्स आणि अँबुलेंससह हॉस्पीटलसंबंधी सेवा देणाऱ्या लोकांची राज्याबाहेर येणे जाणे सुरू राहणार.

या इतर सेवा सुरू राहतील

 • ट्रक रिपेयरसाठी हायवेवर दुकान आणि ढाबे सुरू. राज्य/केंद्र शासित राज्य प्रशासन यावर लक्ष ठेवणार.
 • ई-कॉमर्स कंपन्यादेखील काम सुरू ठेवणार, पण सोशल डिस्टंसींगचे पालन केले जाईल.
 • लॉकडाउमुळे अडकलेले हॉटल, गेस्टहाउस आणि लॉज सुरू होणार.
 • शेतीसंबंधई मशीन आणि त्यांचे स्पेअर पार्ट बनवणारी दुकाने.
 • पशु शेल्टर आणि गौशाळा सुरू.
 • सामान/कार्गोचे येणे जाणे सुरू राहणार.
 • सर्व प्रकारचे सामना ने आण करणे सुरू राहणार. तसेच, रेल्वेच्या माध्यमातून पार्सल सेवादेखील सुरू राहतील.
 • विमानांचा कार्गो, मदत आणि लोकांना आणण्यासाठी वापर केला जाईल.
 • बंदरांवरुन देशांतर्गत आण बाहेरील घरगुती गॅस, खाद्य सामग्री आणि मेडिकल सप्लाय सुरू राहणार.
 • रस्ते मार्गाने गरजेच्या वस्तुंची ने आण करणे सुरू राहील. यात दोन ड्रायवर आणि एक हेल्परला जाण्यास परवानगी.
 • सर्व केंद्रीय कार्यालय सुरू राहतील.
 • केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या सर्व मंत्रालयात येणाऱ्या डिपार्टमेंट्स आणि ऑफिसमध्ये डिप्टी सेक्रेटरी आणि त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना 100% उपस्थिती अनिवार्य असेल. यापेक्षा खालील 33% पेक्षा जास्त अधिकाऱी आणि इतर स्टाफना गरजेनुसार बोलवले जाईल.
 • सशस्त्र बल, आरोग् आणि कुटुंब कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, हवामान विभाग, केंद्रीय सूचना आयोग, एफसीआय, एनसीसी, नेहरू युवा केंद्र आणि कस्टमच्या ऑफीसमध्ये काम सुरु असेल.
 • पोलिस, होमगार्ड, सिविल डिफेंस, फायर आणि इमरजेंसी सर्विस, आपत्ती व्यवस्थापन, जेल आणि पालिकेच्या कार्यालयात कामकाज सुरू राहील.
 • यासोबत इतर काही कार्यालयांमध्ये ठराविक कर्मचाऱ्यांसोबत काम सुरू असेल. ग्रुप ए आणि बीचे अधिकारी गरजेनुसार ऑफीसमध्ये येतील. ग्रुप सी आणि त्याखालील 33% कर्मचाऱ्यांसोबत काम होईल या सुविधा 3 मेपर्यंत बंद
 • सर्व प्रकारचे देशांतर्गत आणि देशाबाहेरील विमान सेवा.0
 • प्रवासी ट्रेन वाहतुक बंद असेल.
 • पब्लिक ट्रांसपोर्टमध्ये कामी येणाऱ्या सर्व बस सेवा.
 • मेट्रो रेल्वे सेवा बंद राहतील.
 • मेडिकल इमर्जन्सी असल्याशिवाय लोक दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकणार नाहीत.
 • सर्व प्रकारचे एजुकेशन, ट्रेनिंग आणि कोचिंग इंस्टिट्यूट्स बंद राहतील.
 • ज्यांना परवानगी मिळाली आहे, त्याशिवाय इतर सर्वत कमर्शियल आणि इंडस्ट्रियल कामकाज बंद.
 • ऑटो रिक्शा, सायकिल रिक्शा, टॅक्सी आणि कॅब सेवा बंद.
 • सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम, असेंबली हॉल आणि यासंबंधी इतर ठिकाणे.
 • सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, अकादमिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम बंद.
बातम्या आणखी आहेत...