आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Education Policy Will Create 'job Givers' Instead Of 'job Seekers': Narendra Modi

स्मार्ट इंडिया हॅकाथाॅन-2020:नवे शैक्षणिक धोरण “नोकरी शोधणारा’ ऐवजी “नोकरी देणारा’ घडवेल : नरेंद्र मोदी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या बदलांमुळे भारताच्या ज्ञानाची शक्ती वाढेलच शिवाय एकात्मताही वाढीस लागेल - पंतप्रधान

नव्या शैक्षणिक धाेरणामुळे देश भविष्यात आत्मनिर्भर होईल, कारण “नोकरी शोधणारा’ ऐवजी “नोकरी देणारे’ घडवण्यावर याचा भर आहे. युवकांना आता नोकरीच करायची नाही तर स्वत:ही आत्मनिर्भर व्हायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लोकांची मानसिकता बदलणे आणि युवा पिढीला आत्मनिर्भर बनवण्यात तसेच देशाला शिक्षणाचे ‘ग्लोबल हब’ बनवण्यात मदत होईल, असेही मोदींनी सांगितले.

शनिवारी सायंकाळी स्मार्ट इंडिया हॅकाथाॅन-२०२० च्या ग्रँड फिनालेत सहभागी स्पर्धकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. हे चौथे हॅकाथॉन आहे, ज्याच्या अंतिम फेरीत १० हजार विद्यार्थी भाग घेत आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करताना मोदींनी सांगितले की, २१ वे शतक ज्ञानाचे शतक असून वेगाने बदलणाऱ्या जगात भारतालाही वेगात बदलावे लागेल. नव्या शैक्षणिक धोरणात आधीच्या त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. एखाद्याला गणित आणि संगीत एकत्र शिकायचे असेल तर त्याला शिकता येईल.

देशाच्या भाषा वाढतील

माेदींनी सांगितले, नव्या शैक्षणिक धोरणामुळे केवळ भारताच्या भाषाच वाढणार नाहीत तर जगालाही भारताच्या समृद्ध भाषांची ओळख होईल. या बदलांमुळे भारताच्या ज्ञानाची शक्ती वाढेलच शिवाय एकात्मताही वाढीस लागेल.

बातम्या आणखी आहेत...