आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Era In Ayodhya : Bollywood Artists Perform Three Hours A Day Rehearsing Without Retech; It Takes Two And A Half Hours To Prepare

अयोध्येत नवे युग:अयोध्येच्या रामलीलेत शरयूतून वाहताहेत सद्भावनेचे पाट; रिटेक न घेता बॉलीवूड कलाकारांचा अभिनय, रोज सुरू 3 तासांचा सराव

विजय उपाध्याय |अयोध्या2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी श्रीरामाच्या राज्याभिषेकाने रामलीलेचा प्रारंभ झाला. कैकेयी राजा दशरथांकडून दोन वचने घेते. पहिले रामाला १४ वर्षांचा वनवास आणि भरताचा राज्याभिषेक. यामुळे राजा दशरथ यांना रघुकुलाच्या परंपरेनुसार आपले वचन पूर्ण करावे लागते. हे दृश्य बघून लोक आपल्या अश्रूंवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. - Divya Marathi
मंगळवारी श्रीरामाच्या राज्याभिषेकाने रामलीलेचा प्रारंभ झाला. कैकेयी राजा दशरथांकडून दोन वचने घेते. पहिले रामाला १४ वर्षांचा वनवास आणि भरताचा राज्याभिषेक. यामुळे राजा दशरथ यांना रघुकुलाच्या परंपरेनुसार आपले वचन पूर्ण करावे लागते. हे दृश्य बघून लोक आपल्या अश्रूंवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
  • दूरदर्शन व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अयोध्येच्या रामलीला 5 कोटींपेक्षा जास्त जण लाइव्ह बघताहेत
  • रावण झाले शाहबाज खान… शिवतांडव स्तोत्राचे करताहेत गायन

अयोध्येत आधुनिकतेच्या नव्या प्रयोगांसोबत सहिष्णुतेचा रंग घट्ट होत आहे. शरयूच्या काठावरील लक्ष्मण किल्ल्यात रामलीला सादर केली जात आहे. भव्य दिव्य सेट आणि प्रकाशझोतात रामलीलेचा रोमांच बॉलीवूडच्या कलाकारांनी वाढवला आहे. दिल्ली व मुंबईतील १२० कलाकारांचा ताफा अयोध्येत रामलीला सादर करत आहेत. ५ कोटींपेक्षा जास्त जण तिचे थेट प्रक्षेपण बघताहेत. रावणाची भूमिका करणारे शाहबाज खान भगवान शंकराच्या शिवतांडव स्तोत्राचे गायन करत आहेत. ते सांगतात, रामलीला, राम आणि रावणाशी संबंधित घटनांचा प्रवाह आहे. रावण भगवान शिवाचा मोठा भक्त होता. तसेच अहंकारीही. ही त्याच्यातील उणीव होती. मी मुसलमान असलो तरी लहानपणापासून रामायण वाचले आणि समजून घेतले. प्रयोगाच्या तयारीबाबत म्हणतात की, थेट प्रक्षेपणाचे मोठे आव्हान होते. एकाही रिटेकची संधी नव्हती. यामुळे ऑगस्टपासूनच तयारी करत आहोत. अजूनही दोन ते तीन तासांचा सराव करतो आणि सादरीकरणाआधी मंचावर जात सराव करतो. रामलीलेत अंगद बनलेले भाजप खासदार रवी किशन सांगतात की, अयोध्येतील रामलीलेमध्ये संपूर्ण भारत आहे. नारद झालेले असराणी सिंधचे तर हनुमान झालेले बिंदू दारासिंह पंजाबचे आहेत. बिंदू सांगतात की, माझ्या वडिलांनी हनुमानाची भूमिका केली होती. अयोध्येत रामलीला त्रेतायुगाची जाणीव करून देते. यात सद्भावाची शरयू वाहते. हाच देशाचा अंतरात्मा आहे. सीतेची भूमिका करणारी टीव्ही अभिनेत्री कविता जोशीचा मेकअप सुरू होता. ती म्हणते, सीतेच्या रूपात येण्यासाठी दररोज दोन ते अडीच जास्त मेकअपला लागतात. कलाकारांच्या मेकअपसाठी १२ कलाकार आहेत. रामलीलेचे आयोजक बॉबी मलिक सांगतात, दूरदर्शन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोज ५ कोटींपेक्षा जास्त बघताहेत. आभासी रामलीला अयोध्येतील लोक घरीच टीव्हीवर बघून समाधानी आहेत. हनुमान मंदिराचे पुजारी संतोष वैदिक सांगतात, मठमंदिरात होणारी रामलीला मर्यादित राहिली. मात्र, नव्या रामलीलामुळे वातावरण बदलत आहे. हॉटेल व्यावसायिक अनुप गुप्ता सांगतात, ही रामलीला समोरुन बघण्यासाठी देशभरातून त्यांच्याकडे चौकशी होत आहे. पुढील वर्षापासून मंचासमोर बसून ही रामलीला बघण्याची संधी मिळेल अशी आशा आहे.

रामाला १४ वर्षांचा वनवास

मंगळवारी श्रीरामाच्या राज्याभिषेकाने रामलीलेचा प्रारंभ झाला. कैकेयी राजा दशरथांकडून दोन वचने घेते. पहिले रामाला १४ वर्षांचा वनवास आणि भरताचा राज्याभिषेक. यामुळे राजा दशरथ यांना रघुकुलाच्या परंपरेनुसार आपले वचन पूर्ण करावे लागते. हे दृश्य बघून लोक आपल्या अश्रूंवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

हायटेक प्रक्षेपण

रामलीलेच्या थेट प्रक्षेपणासाठी दूरदर्शनच्या ५५ सदस्यांचे पथक दिल्लीहून येथे आले आहे. ९ एचडी कॅमेरे वेगवेगळ्या पद्धतीने मंचाचे चित्रीकरण करत आहेत. लक्ष्मण किल्ल्यावरील भव्य सेट उभा करण्यासाठी ९ दिवस लागले. तो हरिभाईंनी तयार केला आहे. १०० पेक्षा कारागीर त्यासाठी लागले होते.

बातम्या आणखी आहेत...