आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • New Exposer In Ambani Security Scare: The Telegram Channel From Which The Responsibility For Possessing Explosives Was Made In Tihar Jail.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटीलिया प्रकरणात नवा खुलासा:ज्या टेलीग्राम चॅनलवरुन स्फोटके ठेवण्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली, त्याचे लोकेशन दिल्लीच्या तिहार तुरुंगात

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षा विश्लेषणाच्या अहवालानुसार 26 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता 'टार' नेटवर्कद्वारे टेलिग्राम चॅनल तयार करण्यात आले.

मुकेश अंबानींचे घर अँटीलियाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पियो आढळली होती. आता याविषयी महत्त्वाचा खुलासा झाला आहे. 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने एका खासगी सायबर एजन्सीचा हवाला देत दावा केला आहे की, 'जी कथित दहशतवादी संघटना म्हणजेच' जैश-उल हिंद ' च्या ज्या टेलीग्राम चॅनलवरुन स्फोटके ठेवण्याची जबाबदारी घेण्यात आली होती. ते चॅनल तिहार तुरुंगात तयार करण्यात आले होते. केंद्राच्या आदेशानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे.

अधिकृत सूत्रांनी वृत्तपत्राला सांगितले की या खासगी सायबर एजन्सीला तपास एजन्सीने (संभवतः NIA) फोन ट्रॅक करण्यास सांगितले होता. हा तोच फोन होता ज्यावर टेलीग्राम चॅनेल बनवले गेला होता. त्यांनी तपास यंत्रणेची ओळख उघड केली नाही, परंतु केंद्रीय एजन्सींनी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाला ही माहिती दिली असल्याचे ते म्हणाले.

सिमकार्डचे लोकेशन तिहार तुरुंग होते
खासगी सायबर फर्मने तयार केलेल्या सुरक्षा विश्लेषणाच्या अहवालानुसार 26 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता 'टार' नेटवर्कद्वारे टेलिग्राम चॅनल तयार करण्यात आले. ज्याचा वापर डार्क वेबचा उपयोग करण्यासाठी केला जातो. हे ज्या सिमकार्डद्वारे केले गेले त्याचे लोकेशन तिहार तुरूंगात येत आहे. डार्क वेब इंटरनेटचा एक भाग आहे ज्यामध्ये केवळ TOR सारख्या अज्ञात नेटवर्कद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो, पारंपारिक शोध इंजिने नव्हे.

जबाबदारी स्वीकारणाऱ्या संघटनेने म्हटले होते
28 फेब्रुवारी रोजी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेने स्फोटकांनी भरलेले वाहन उभे करण्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र, दुसर्‍याच दिवशी त्याच संस्थेने यास नकार देऊन दुसर्‍या टेलिग्राम वाहिनीवर पोस्टर जारी केले.

स्फोटक ठेवल्याची जबाबदारी घेणाऱ्या संस्थेने लिहिले की, 'हा फक्त ट्रेलर आहे आणि पिक्चर अजून बाकी आहे. शक्य असल्यास मला थांबवा. तुम्ही काहीही करू शकले नव्हते, जेव्हा आम्ही तुमच्या नाकाखाली दिल्लीमध्ये हिट केले होते, तुम्ही मोसादसोबत हात मिळवला, मात्र काहीच झाले नाही. तुम्हाला माहिती आहे की, तुम्हाला काय करायचे आहे. फक्त पैसे ट्रान्सफर करा, जे तुम्हाला पहिले सांगण्यात आले आहे.

जैश-उल-हिंदने स्फोटके ठेवण्याची जबाबदारी घेतली होती, ते पोस्टर.
जैश-उल-हिंदने स्फोटके ठेवण्याची जबाबदारी घेतली होती, ते पोस्टर.
जैश-उल-हिंदने स्फोटके ठेवण्याचे वृत्त नाकारत हे पत्र जारी केले होते
जैश-उल-हिंदने स्फोटके ठेवण्याचे वृत्त नाकारत हे पत्र जारी केले होते
बातम्या आणखी आहेत...