आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Game Launch For Sangh Branches, Including Questions On Ramayana Mahabharata And Great Men! Big Change In RSS After 5 Years

दिव्य मराठी विशेष:संघाच्या शाखांसाठी नवे गेम लाँच, यात रामायण-महाभारत व महापुरुषांवर प्रश्न! राष्ट्रीय स्वयंसेवक संघात 5 वर्षांनंतर मोठा बदल

नवी दिल्ली (मुकेश कौशिक)18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शारीरिक कसरतीपासून ते बौद्धिक कसरतीपर्यंत

आपल्या स्वयंसेवकांना संस्कारी, सद्गुणसंपन्न, चपळ आणि निर्णयकुशल बनवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता नवीन क्विझ गेम स्वीकारले आहेत. ते ई-शाखांत सहजपणे खेळले जाऊ शकतात. संघाचे अ. भा. कुटुंबप्रमुख रवींद्र जोशी म्हणाले, ‘सोप्या वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरेही मुले देऊ शकत नाहीत. उदा. लाल रंगाची गाय हिरवे गवत खाऊन कोणत्या रंगाचे दूध देईल, या प्रश्नाचे उत्तर हिरवे किंवा लाल असे मिळते. त्यामुळे आम्ही मुलांना व्यवहारज्ञान देण्यासाठी पालकांना प्रेरित करत आहोत. त्याचप्रमाणे रामायण आणि महाभारताशी निगडित प्रश्नमंजूषाही बनवण्यात आली आहे. यात स्वयंसेवक गटांत विभागून दोन्ही ग्रंथांतील २०-२० पात्रांची नावे सांगतात. जोशींनी सांगितले की, ‘ई-शाखांमुळे आता लाठी-दंडाचे खेळ मागे राहिले. अनेक कुटुंबांत ते शक्य नाहीत. त्यामुळे ई-गेम्स यशस्वी होताहेत. २०१६ मध्ये हाफ चड्डीऐवजी भुरकट रंगाची पँट स्वीकारल्यानंतरचा हा मोठा बदल आहे.
शारीरिक कसरतीपासून ते बौद्धिक कसरतीपर्यंत
संघाच्या सर्वच ४५ प्रांतांनी विकसित केले गेम, स्थानिक खेळांचीही जोड
ध्रुव गेम : यात स्वयंसेवक रामायण किंवा महाभारतातील एखाद्या पात्राचा विचार करतो. उर्वरित तरुण त्याला प्रश्न विचारून योग्य नावापर्यंत पोहोचतात.
शारीरिक व्यायाम : यात छोटे-छोटे व्यायाम आहेत. जसे जमिनीवर बसल्यानंतर आधार न घेता उभे राहणे, दोन्ही पाय पसरून डोके गुडघ्याला टेकवणे आदी.
पगडी : देशातील महापुरुषांची ओळख करून देण्यासाठी त्यांची पगडी दाखवून त्यांना हे महापुरुष कोण आहे, असे विचारले जाते.
गुण-दुर्गुणांचे टोपले : यात चांगल्या-वाईट सवयींची चिठ्ठी असते. एक एक चिठ्ठी उचलून गुण-दुर्गुण सांगितले जातात.

बातम्या आणखी आहेत...