आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Guidelines On Corona Virus । Central Government; People To Decide Delta Variant Come Or Not; News And Live Updates .

कोरोनावर सरकारच्या सुचना:त‍िसरी लाट येईल की नाही हे आपल्या हातात, डेल्टा व्हेरिएंटची अनपेक्षित वागणूक महामारीचे च‍ित्र बदलू शकतो

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेल्टा व्हेरिएंटवर लसीचा प्रभाव पडताे का?

केंद्र सरकारने कोरोनाची त‍िसरी लाट लक्षात घेता डेल्टा प्लस व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न घोष‍ित केले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. त्यानुसार संबंधित राज्यांना कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कडक न‍िर्देश द‍िले आहेत. कोरोनाची त‍िसरी लाट येणार की नाही हे आपल्या हातात असल्याचे कोव‍िड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही के पॉल यांनी सांग‍ितले आहे.

यासाठी आपली श‍िस्त खूप महत्वाची असून डेल्टा प्लस व्हेरिएंटची अनपेक्ष‍ित वागणूकदेखील कोरोना महामारीचे च‍ित्र बदलू शकते असे ते म्हणाले. त्यासोबतच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी सरकारचे काय म्हणणे आहे हे आपण जाणून घेऊया...

1. डेल्टा व्हेरिएंटवर लसीचा प्रभाव
देशात गेल्या काही द‍िवसापासून डेल्टा प्लस व्हेरिएंटने पाय पसरायला सुरुवात केली आहे. देशातील 12 राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट लसीचा प्रभाव कमी करतो का? याबाबत अजून अध‍िकृत माह‍िती समोर आलेली नाहीये. त्यामुळे यावर अजून जास्त अभ्यासाची गरज असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट नुकताच आला असून वैज्ञान‍िक त्याबद्दलची माह‍िती जमा करत आहे. डेल्टा प्लसमुळे लसीवर होणारा परिणाम आणि संसर्गाच्या गती यावर संशोधन होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

2. कोव्हॅक्सिन आणि कोव्ह‍िशील्ड
सीरम इन्स्टिट्यूटची कोव्ह‍िशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस कोरोना व्हायरसवर प्रभावी असल्याचे इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चच्या वैज्ञानिक चाचणीतून समोर आले आहे. त्यासोबतच डेल्टा व्हेरिएंटवरही प्रभावी असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

3. कोरोनाची तिसरी लाट
कोरोनाची त‍िसरी लाट केंव्हा येईल हे अद्याप सांगता येणार नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परंतु, ही लाट येणार की नाही हे आपल्यावर अंवलबून असून यासाठी आपली श‍िस्त खूप महत्वाची आहे. कारण यामाध्यमातून आपण क‍ितीही मोठ्या लाटेवर न‍ियंत्रण म‍िळवू शकतो. कोरोनाची क‍िती मोठी असेल हे कंटेंटमेंट धोरण, लसीकरणाची गती आणि आमच्या वर्तनावर अवलंबून असते.

बातम्या आणखी आहेत...