आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदीमुळे घाबरली टीआरएफ:काश्मिरी पंडितांची नवी हिट लिस्ट प्रसिद्ध

श्रीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिरेकी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने(टीआरएफ) काश्मिरी पंडित सरकारी कर्मचाऱ्यांची एक नवी यादी जारी करून हत्येची धमकी दिली आहे. यानंतर सुरक्षा संस्थांनी अलर्ट जारी केला आहे. काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त केला आहे. टीआरएफची ही हिट लिस्ट गृह मंत्रालयाने निर्बंध घातल्याच्या एका दिवसानंतर जारी केली आहे. प्रत्यक्षात ही पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाची शाखा आहे. ही २०१९ मध्ये अस्तित्वा आली होती. गृह मंत्रालयानुसार, टीआरएफ युवांची ऑनलाइन भरती करून अतिरेकी कारवायांत सामील करत आहे.

सीमापार घुसखोरी आणि शस्त्र, ड्रग्जच्या तस्करीतही सहभागी आहे. कोलकात्यात २ अतिरेक्यांना अटक : विशेष कृती दलाने शुक्रवारी रात्री २ संशयित अतिरेक्यांना अटक केली. त्यांना बँकशाल कोर्टात हजर केले. दोघांना १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यता आले. हावड्यात छापा टाकून ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...