आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Jobs Grow The Most In 14 Years, The Services Sector Is Booming, The Economic Cycle Will Now Be More Dynamic

तरुणांसाठी आनंदाची बातमी:नव्या नोकऱ्यांमध्ये 14 वर्षांत सर्वाधिक वाढ, सेवा क्षेत्रात भरभराट, आता अर्थचक्र अधिक गतिमान होणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच देशातील सेवा क्षेत्र भरभराटीस आले आहे. खरेदीचा आलेख दर्शवणारा निर्देशांक एस अँड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) ऑगस्ट महिन्यात वाढून तो अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे 57.2 वर गेला आहे.

सेवा क्षेत्रातील वाढती उलाढाल पाहता विविध मानांकन संस्थानी खरेदी निर्देशांक 55 पर्यंत असेल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु जुलैमध्ये तो 55.5 होता आणि विशेष म्हणजे सलग 13 व्या महिन्यात पीएमआय 50 पेक्षा अधिक आहे.

अनेक नवे उद्योग सुुरु झाल्याने सेवा क्षेत्र भरभराटीस आल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यामध्ये रोजगार वाढले आहेत. एसअँडपीच्या सर्वेक्षणानुसार ऑगस्ट महिन्यात 14 वर्षानंतर रोजगारामध्ये सर्वाधिक वाढ नोंदली गेली आहे. यात सेवा क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी)मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा 50% असल्यामुळेच ही बाब अत्यंत महत्वाची ठरली आहे. कारण कोरोना काळात सर्वाधिक फटका सेवा क्षेत्रालाच बसला होता.एसअँडपी ग्लोबल मार्केट इंटेलिजेंन्सचे सहायक संचालक पोलिन्ना डी. लीमा यांनी सांगितले की, कोविड-१९ पश्चात सर्व निर्बंध दूर झाल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. यंदा दुसऱ्या तिमाहीच्या (जुलै-सप्टे.) मध्यात सेवा क्षेत्रात जोरदार वृद्धी झाली आहे.

महागाई गगनाला, मात्र मागणी वाढली

सेवा क्षेत्रातील ४०० प्रमुख कंपन्यांचे एसअँडपी ग्लोबलतर्फे सर्वेक्षण केले जाते त्यानुसार आकडेवारी जाहीर केली जाते. सेवा क्षेत्रात व्यापार, हॉटेल्स, रेस्तराँ, वाहतूक, दूरसंचार, वित्तक्षेत्राशी संबधित सेवा, बांधकाम क्षेत्र, बँकिंगसारख्या प्रमुख उद्योगांचा समावेश असतो. ताज्या अहवालानुसार वित्त आणि विमा क्षेत्रातील कंपन्याची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात महागाई वाढूली तरीही बाजारात मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कंपन्यांचा महसुलातही वाढ झाली. परिणामी कंपन्यांनी नव्या नोकऱ्या देण्यास सुरुवात केली आहे.

वेगवान अर्थव्यवस्थेला आगामी काळात अडथळे

एप्रिल ते जून दरम्यान अर्थव्यवस्थेला सर्वाधिक गती मिळाली. परंतु, काही अर्थतज्ज्ञांच्या मते, पुढील तिमाहींमध्ये या अर्थचक्राला खीळ बसू शकते. सातत्याने वाढणारे व्याजदर, महागाई आणि जागतिक मंदीचे सावट पाहता त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...