आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एनसीईआरटीने शाळा सुरू करण्याच्या तयारीबाबत सरकारला दिशानिर्देशांचा मसुदा दिला आहे. मसुद्यानुसार, शाळा सुरू झाल्यानंतर एका इयत्तेचे विद्यार्थी एकाच वेळी शाळेत येणार नाहीत. त्यासाठी रोल नंबरच्या आधारावर सम-विषम सूत्र लागू राहील किंवा दोन शिफ्टमध्ये हे विद्यार्थी येतील. मुलांच्या शाळेत येण्याच्या वेळांतही १०-१० मिनिटांचा फरक राहील. फिजिकल डिस्टन्सिंगसाठी वर्ग खुल्या जागेत घेतले तर अधिक चांगले राहील, असे मसुद्यात म्हटले आहे.
शाळा सुरू करण्याचे ६ टप्पे
> पहिला टप्पा - ११ वी-१२ वीचे वर्ग सुरू होतील
> १ आठवड्याने - ९ वी -१० वीचे वर्ग सुरू होतील
> २ आठवड्यांनी - ६ वी ते ८ वीचे वर्ग सुरू होतील
> ३ आठवड्यांनी - तिसरी ते ५ वीचे वर्ग सुरू होतील
> ४ आठवड्यांनी - पहिली,दुसरीचे वर्ग सुरू होतील
> ५ आठवड्यांनी - पालकांच्या संमतीनेच नर्सरी- केजीचे वर्ग सुरू होतील
मात्र, कंटेनमेंट झोन जोपर्यंत ग्रीन झोनमध्ये बदलत नाही तोपर्यंत तेथील शाळा बंदच राहतील
शाळा : वर्गात मुलांमध्ये ६ फूट अंतर आवश्यक
> वर्गात ३० किंवा ३५ मुले असतील. मुलांत ६ फूट अंतर आवश्यक
> वर्गात एसी चालणार नाही. दरवाजे, खिडक्या उघड्या राहतील
> मुलांना सम-विषम सूत्रांनुसार बोलवावे लागेल. मात्र, गृहपाठ रोज द्यावा लागेल.
> मुले रोज एकाच जागी बसावीत त्यासाठी डेस्कवर नाव राहील.
> १५ दिवसांनी मुलाच्या प्रगतीबाबत पालकांशी चर्चा करावी लागेल.
> खोल्या रोज निर्जंतुक होतात की नाही हे व्यवस्थापनाला पाहावे लागेल.
> सकाळची प्रार्थना, वार्षिकोत्सव आदी कार्यक्रम होणार नाहीत.
> शाळेबाहेर खाण्या-पिण्याचे स्टॉल लागणार नाहीत.
> स्टाफ आणि विद्यार्थ्यांना प्रवेशापूर्वी स्क्रीनिंग अनिवार्य असेल
विद्यार्थी : वही,पेन्सिल, पेन देव-घेव करणार नाहीत
> प्रत्येकाला मास्क आवश्यक
> मुले वही, पेन, पेन्सिल, इरेझर शेअर करू शकणार नाहीत.
> पाणी सोबत आणतील. जेवण कुणाशीही शेअर करणार नाहीत.
> जे विद्यार्थी शाळेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळणार नाहीत, त्यांच्या पालकांना सूचना जाईल.
पालक : फ्रंटलाइनबाबत तसे सांगावे लागेल
> जे पालक चिकित्सा, संरक्षण वा सफाईच्या कामात असतील तर त्यांना शाळेत कळवावे लागेल.
> ज्यांना फोनवर संपर्क साधता येणार नाहीत, त्यांनाच शिक्षकांना भेटता येईल.
> पीटीएम नसेल, दर १५ दिवसांनी शाळांतील मुलांच्या प्रगतीबाबत विचारणा करता येईल.
वाहतूक : एका आसनावर एकच विद्यार्थी बसेल
वाहतुकीबाबत लवकरच सविस्तर गाइडलाइन जारी होईल. एका आसनावर एकच मूल बसेल.
होस्टेल : सहा फूट अंतरावर बेड लावावे लागतील
क्षमतेच्या ३३% मुले होस्टेलमध्ये राहतील. दर ६ फुटांवर बेड राहील. त्यांना बाजारात जाता येणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.