आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Parliament Controversy | Supreme Court PIL Hearing | PM Modi BJP Vs Rahul Gandhi

वाद:सुप्रीम कोर्टाचा संसदेच्या उद्घाटन वादावर सुनावणी करण्यास नकार; याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली, हायकोर्टात जाण्यास नकार

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. सुनावणीत कोर्ट म्हणाले - तुम्ही लोक अशी याचिका का दाखल करता हे समजत नाही? यात तुमचा कोणता इंटरेस्ट आहे? त्यानंतर याचिकाकर्त्या वकील जया सुकीन यांनी आपली याचिका मागे घेतील. त्यांनी या प्रकरणी हायकोर्टात जाण्यासही नकार दिला आहे.

सुनावणीवेळी न्यायमूर्ती माहेश्वरी म्हणाले - बराच वेळ युक्तिवाद केल्यानंतर याचिका मागे घेण्याची परवानगी मागण्यात आली आहे. त्यांनी सॉलिसिटर जनरलला विचारले - मिस्टर एसजी, तुम्हाला काही समस्या?

त्यावर एसजी मेहता म्हणाले - याचिका मागे घेतल्यानंतर ते उच्च न्यायालयात जाऊन युक्तिवाद करतील. न्यायालयाने या प्रकरणांत कोणताही वाद नसल्याचे सांगितले पाहिजे.

त्यानंतर याचिकाकर्त्या अॅडव्होकेट जया सुकीन यांनी आपली याचिका मागे घेतली. त्यांनी उच्च न्यायालयात जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. सुकीन यांनी गुरुवारी ही याचिका दाखल केली होती. त्या आपल्या याचिकेत म्हणाल्या होत्या की, लोकसभा सचिवालयाने राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी निमंत्रित न करून संविधानाचे उल्लंघन केले. या प्रकरणी लोकसभा सचिवालय, गृह मंत्रालय व कायदा मंत्रालयाला या खटल्यात पक्षकार करण्यात आले होते.

याचिकाकर्ते म्हणाले- राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक, त्यांच्याच नावाने सर्व कामे होतात
अधिवक्ता जया सुकीन यांनी याचिकेत म्हटले होते की- 18 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसदेचे उद्घाटन करणार असल्याचे लोकसभा सचिवालयाकडून सांगण्यात आले. संसदेत राष्ट्रपती व संसदेची दोन सभागृहे असतात. राष्ट्रपती देशाचा प्रथम नागरिक असतो. राष्ट्रपतींना संसद बोलावण्याचा व विसर्जित करण्याचा अधिकार आहे.

राष्ट्रपतीच पंतप्रधान व इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. त्यांच्याच नावाने सर्व कामे चालतात. पण लोकसभा सचिवालयाने कोणताही सारासार विचार न करता मनमानी पद्धतीने आदेश जारी केला. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न करणे हे संविधानाचे घोर उल्लंघन आहे. राष्ट्रपतींना कार्यकारी, विधिमंडळ, न्यायिक व लष्करी अधिकार देखील असतात.

हे छायाचित्र नव्या संसद भवनातील लोकसभागृहाचे आहे. 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
हे छायाचित्र नव्या संसद भवनातील लोकसभागृहाचे आहे. 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे.

20 विरोधी पक्षांचा बहिष्कार, 25 पक्ष सहभागी होणार
काँग्रेससह 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलून पंतप्रधानांनी उद्घाटन करण्याचा निर्णय हा घोर अपमान असून, लोकशाहीवरीलही थेट हल्ला असल्याचे विरोधकांचा आरोप आहे. दुसरीकडे, उद्घाटन सोहळ्यात भाजपसह 25 पक्ष सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी 10 डिसेंबर 2020 रोजी संसद भवनाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले होते.
पंतप्रधान मोदींनी 10 डिसेंबर 2020 रोजी संसद भवनाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले होते.

या बातम्या पण वाचा...

तीन देशांचा दौरा करून पंतप्रधान मोदी दिल्लीत परतले: म्हणाले- ऑस्ट्रेलियातील भारतीय समारंभात सत्ताधारी - विरोधक एकत्र बसले, हा आहे लोकशाहीचा आत्मा

तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सकाळी दिल्लीत परतले. पालम विमानतळावर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले. इथे ते म्हणाले की लोकशाहीचा आत्मा काय आहे, लोकशाहीची ताकद काय आहे, हे ऑस्ट्रेलियात झालेल्या भारतीय कार्यक्रमाकडे पाहून समजू शकते. वाचा संपूर्ण बातमी...

नवीन संसद भवन:गृहमंत्री शहा म्हणाले- PM नवीन संसद भवनात सेंगोल ठेवतील, हे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक

गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी दुपारी 12 वाजता नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. यादरम्यान संसदेत सेंगोल (राजदंड)ही ठेवण्यात येणार आहे. सेंगोल हे एक प्रकारचे शक्ती हस्तांतरणाचे प्रतीक आहे. संसद भवनात अध्यक्षांच्या खुर्चीजवळ सेंगोल ठेवण्यात येईल.

गृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ते ब्रिटिशांकडून घेतले होते. हे तामिळनाडूतून मागवण्यात आले होते. आता ते प्रयागराज येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे हे प्रतिबिंब असेल. येथे वाचा संपूर्ण बातमी...