आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवसांपूर्वी नवीन संसदेचे भूमिपूजन केले होते. यावरून तमिळ अभिनेता-दिग्दर्शक कमल हसन यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. देश कोरोनाशी झगडत आहे. महामारीमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, अशात नवीन संसद भवनाची गरज काय? असा सवाल कमल हसन यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचे उत्तर द्यावे अशी मागणीही त्यांनी केला.
कमल हसन यांनी सोशल मीडियावर लिहिले की "कोरोनामुळे अर्धा देश भुकेला आहे आणि अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत तर मग हजारो कोटींची नवीन संसद कशाला हवी? जेव्हा चीनची भिंत बांधताना हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, तेव्हा राज्यकर्त्यांनी सांगितले की ते लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक होते. तुम्ही कोणाच्या बचावासाठी हजारो कोटींची संसद उभारत आहात? आदरनीय पंतप्रधानांनी याचे उत्तर द्यावे."
2018 मध्ये पक्षाची स्थापना केली
हासनने अभिनेता म्हणून बर्यापैकी नाव कमावले. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक म्हणूनही काम केले. हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. 2018 मध्ये आपला पक्ष मक्कल निधी म्यायीम स्थापन केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष एकही जागा जिंकू शकला नाही, परंतु त्यांना जवळपास 4% मते मिळाली.
विधानसभा निवडणुकांवर लक्ष
2021 च्या विधानसभा निवडणुकीवर हसन यांच्या पक्षाचे लक्ष आहे. लवकरच तो मदुराई येथून आपल्या पहिल्या निवडणूक प्रचाराची सुरूवात करणार आहे तर, तामिळनाडूमध्ये भाजप आणि AIMDK एकत्र निवडणुका लढवणार आहेत.
10 डिसेंबर रोजी केले होते भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 डिसेंबर रोजी नवीन संसद भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन केले होते. या नवीन भवनात लोकसभेच्या खासदारांसाठी सुमारे 888 आणि राज्यसभा खासदारांसाठी 326 सीट असतील. पार्लियामेंट हॉलमध्ये एकाचवेळी 1 हजार 224 सदस्यांना बसला येईल. सध्याची संसदेच्या बांधकामास 1921 मध्ये सुरुवात झाली होती. 6 वर्षांनी 1927 मध्ये तिचे बांधकाम पूर्ण झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.