आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात एकूण आठ राष्ट्रीय, ५० प्रादेशिक व २७६९ अनोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. ५० प्रादेशिक पक्षांपैकी १८ पक्ष गेल्या २२ वर्षांत स्थापन झालेत. आज त्यांच्याकडे ३५ खासदार आणि ५३९ आमदार आहेत. खासदार आणि आमदारांच्या संख्येच्या प्रमाणात केवळ ११ वर्षांपूर्वी स्थापन वायएसआरसीपी नव्या प्रादेशिक पक्षांत सर्वांत पुढे आहे. त्यांच्याकडे २२ खासदार आणि १५० आमदार आहेत. दुसऱ्या क्रमांकावर टीआरएस आहे. त्यांचे ९ खासदार आणि १०३ आमदार आहेत. आपकडे एकूण १५५ आमदार आहेत. पण एकही खासदार नाही. २०१३ मध्ये स्थापन एनपीएफ २२ वर्षांत एकमेव नवीन राष्ट्रीय पक्ष आहे. मणिपूर-नागालँडमध्ये अस्तित्व असलेल्या या पक्षाकडे १ खासदार व ४२ आमदार आहेत.
या नव्या पक्षांचे १८ राज्यांत अस्तित्व; २२ खासदार व १५५ आमदारांचा वायएसआर पुढे पक्ष कधी स्थापन खासदार आमदार वायएसआरसीपी 2011 22 150 टीआरएस 2001 9 103 आप 2012 0 155 एनडीपीपी 2017 1 42 एसकेएम 2013 0 19 एआययूडीएफ 2004 1 15 एआयएनआरसी 2011 0 10 जेजेपी 2018 0 10
*१८ पैकी ८ नव्या पक्षांचे १० किंवा जास्त आमदार. *एनपीएफ आणि आरएलपीकडे १-१ खासदारच. *२०२० मध्ये स्थापन आरएलपी सर्वात नवा पक्ष. *डीएमडीकेकडे ना खासदार ना आमदार. *मनसे व जीएफपीकडे १-१ आमदार आहे. *यूपीपीएल, आयपीएफटीचे ७-७ आमदार आहेत. *पीडीएफचे ४ व जेसीसीकडे ३ आमदार.
नवे पक्ष येथे- दिल्ली, पंजाब, गोवा, आसाम, तामिळनाडू, मेघालय, बिहार, महाराष्ट्र, मणिपूर, नगालँड, राजस्थान, सिक्किम, तेलंगण, आंध्र, गोवा, त्रिपुरा, छत्तीसगड आणि हरियाणा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.