आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Patients Fell To 62% In Cities And 46% In Villages,The Most Pleasant Trend In The Second Wave Of The Corona; Not Only In Cities, But Also In Villages

शहरांत नवे रुग्ण 62%, गावांत 46% पर्यंत घटले:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वात सुखद ट्रेंड; शहरेच नव्हे, तर गावांतही संसर्गाचा ‘पीक’येऊन गेला

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे विश्लेषण सर्वाधिक सक्रिय रुग्णांची १५ शहरे तसेच सर्वाधिक ग्रामीण लाेकसंख्या असलेल्या १५ जिल्ह्यांतील ट्रेंडवर आधारित

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक येऊन गेला आहे. शहरेच नव्हे, गावांतही रोजच्या नव्या रुग्णांत घसरण होत आहे. आठवडाभरात स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारांची छायाचित्रे कमी झाली आहेत. दुसरीकडे रुग्णालयांत बेड रिकामे झाल्याच्या बातम्या येत आहेत. ही आकडेवारी दिलासादायक ट्रेंड दाखवत आहे. देशात सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या १५ शहरांत बुधवारी ४२,८२३ रुग्ण आढळले. काही दिवसांपूर्वी याच शहरांत रोज सरासरी १.१२ लाख रुग्ण सापडायचे. म्हणजे प्रमाण ६२% घटले आहे. असाच ट्रेंड सर्वाधिक ग्रामीण लाेकसंख्येच्या १५ सर्वात जास्त सक्रिय रुग्णांच्या जिल्ह्यांत आहे. तेथे बुधवारी नव्या रुग्णांची सरासरी ८,५५ होती, गेल्या आठवड्यात ती १५,८१४ होती. म्हणजे ती ४६% घटली आहे.

अशी रोखणार तिसरी लाट?५०% लोक मास्कच घालत नाहीत, ६४% लोक मास्कने नाक झाकत नाहीत
आराेग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, देशात अजूनही ५० टक्के लोक मास्क वापरत नाहीत. ६४ टक्के लोक मास्क तर घालतात, पण नाकच झाकत नाहीत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, देशभरात मास्क वापराबाबत जनजागृतीनंतरही मास्क न वापरणे व तो नाकाखाली सरकवणे ही मोठी समस्या आहे. केंद्र सरकारने मास्कबाबत २५ शहरांत सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, २० टक्के लाेक मास्क तोंडाऐवजी हनुवटीवर ठेवतात. २ टक्के लोक गळ्याला अडकवून ठेवतात. अहवालानुसार, देशात फक्त १४ टक्के लोकच योग्य पद्धतीने मास्कचा वापर करत आहेत. ते मास्कद्वारे नाक, तोंड आणि हनुवटी पूर्णपणे झाकून ठेवतात. मात्र अशा लोकांची संख्या खूपच कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...