आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • New Patients Increased By 50% In 2 Months, But The Mortality Rate Has Also Decreased Now

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:2 महिन्यांत नवे रुग्ण 50% वाढले, परंतु मृत्युदरही आता कमी झाला, येणाऱ्या काळात अमेरिकेत मृत्यू वाढतील

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगात रुग्णसंख्या 1 कोटीच्या पुढे; सरासरी 1.49 लाख रुग्ण, एप्रिलमध्ये 1 लाख रुग्ण रोज आढळत होते

जगात कोरोना रुग्ण १ कोटी आणि मृत्यूंची संख्या ५ लाखांहून अधिक झाली आहे. दिलासा हा की, गेल्या दोन महिन्यांत रोज होणाऱ्या मृत्यूंचा वेग जवळपास थांबला आहे. मात्र, रोज आढळणारे रुग्ण ५०% वाढले आहेत. म्हणजे -आता रोज सरासरी १.५० लाख नवे रुग्ण आढळत आहेत, तर मृत्यूंची सरासरी ४६०० आहे. गेल्या महिन्यात ही सरासरी ४८०० होती आणि एप्रिलमध्ये ६८००. तेव्हा रोज १ लाख नवे रुग्ण आढळत होत. सुरुवातीचे १ लाख मृत्यू धिम्या गतीने झाले. कारण, तोवर कोरोना जगभरात पोहोचला नव्हता. मात्र, त्यानंतर मृत्यू १ वरून २ लाख होण्यास केवळ १५ दिवस लागले. त्यानंतरच्या काळात रुग्ण तर वाढले, मात्र मृत्यूंचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. शेवटचे १ लाख मृत्यू २२ दिवसांत झाले आहेत.

पुढे काय?...आतापर्यंत युरोपमध्ये सर्वाधिक बळी, मात्र येणाऱ्या काळात अमेरिकेत मृत्यू वाढतील

कारण, युरोपच्या ४२ देशांतील ३५ मध्ये रुग्णवाढीचा दर ० % वर आला आहे. दुसरीकडे अमेरिका व ब्राझीलच्या अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण ४% ने वाढत आहे.

- उत्तर व दक्षिण अमेरिकेत २३ लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर युरोपमध्ये फक्त ९ लाख रुग्ण आहेत. ब्रिटन आणि स्पेनने बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा जाहीर केला नाही. तेथील रुग्णांची संख्या ५ लाखांपेक्षा कमी होऊ शकते.

- अमेरिकी देशात मृत्युदर ५% आहे. यानुसार २३ लाख अॅक्टिव्ह रुग्णांपैकी १.१५ लाख रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. आशियात रुग्ण 22%, मृत्यू 10.6%च; युरोपात रुग्ण 24%, पण मृत्यू 38% झाले

बातम्या आणखी आहेत...