आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Policy For Social Media News | Deadline To Implement New Rules Ends Today Action Possible On Facebook, Twitter And Instagram; News And Live Updates

सोशल मीडियावर टांगती तलवार:नवीन नियम लागू करण्याची मुदत आज संपली, फेसबुक म्हणाले - नियमांचे पालन करणार, मनमानी करण्याऱ्या ट्विटर कारवाईची शक्यता

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात आतापर्यंत फक्त 'कू' अॅप ने याचे पालन केले आहे.

टूलकिट प्रकरणावरुन केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी चांगलीच खडाजंगी उडाली होती. दरम्यान, केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी 25 फेब्रुवारी रोजी नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या होत्या व ते लागू करण्यासाठी संबंधितांना तीन महिन्याचा अवधी दिला होता. परंतु, आज या डेडलाईनला 25 मे रोजी तीन महिने होत आहे. परंतु, आजपर्यंत ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी याला लागू केले नाही आहे.

त्यामुळे केंद्र सरकार संबंधित सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म्सवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. कारण भारतात आतापर्यंत फक्त 'कू' अॅप ने याचे पालन केले आहे. त्यामुळे मनमानी करण्याऱ्या ट्विटरसह अनेक सोशल मीडियावर केंद्र सरकार लवकरात लवकर कारवाई करण्याचे संकेत दिसत आहे.

फेसबुक म्हणाले - नियमांचे पालन करेन
या दरम्यान फेसबुकचे उत्तर आले असून सरकारने जारी केलेल्या आयटीच्या नियमांचे पालन करणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे. त्यासोबतच काही मुद्यांवर सरकारशी बोलणी सुरु राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आयटीच्या नियमांनुसार ऑपरेशनल प्रक्रिया लागू करणे आणि फिनिशिंगचे कार्य वाढण्यावर भर असणार आहे. लोक सुरक्षितपणे आपली माहिती या प्लॅटफॉर्मवर शेअर करतील याचादेखील ध्यान ठेवणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

सरकारने सोशल मीडियासाठी कोणती मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली?

  • सरकारने जारी केलेल्या या गाइडलाईनमध्ये येथून पुढे सर्व सोशल मीडियांना भारत देशात 3 अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल संपर्क व्यक्ती आणि निवासी पदवीधर अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे हे अधिकारी भारतात राहणार असून त्यांचे संपर्क क्रमांक संकेतस्थळावर प्रसिद्ध असायले हवे.
  • यासोबतच या प्लॅटफॉर्मवर तक्रार करण्याची सोय काय आहे? संबंधित प्रकरणात अधिकाऱ्यांना तक्रार दाखल केल्यानंतर 24 तासाच्या आत त्या तक्रारीकडे लक्ष द्यावे लागेल. यासोबतच 15 दिवसाच्या आत त्या तक्रारीवर काय कारवाई केली किंवा नाही यांचे उत्तर द्यावे लागतील.
  • संबंधित संकेतस्थळांवरील बलात्कार, बाल लैंगिक अत्याचारासंबंधिचे कंटेंट ओळखण्यासाठी स्वयंचलित साधने आणि तंत्रज्ञानाद्वारे एक प्रणाली तयार केली जावी. पुनरावलोकन व परीक्षण करण्यासाठी पुरेसे कर्मचारीही असायले हवे.
  • नवीन गाइडलाईननुसार, प्रत्येक प्लॅटफॉर्मंना महिन्यातून एकदा एक अवहाल सादर करावा लागणार आहे. ज्यामध्ये आलेल्या तक्रारी, त्यांचे निवारण, हटवलेले कंटेंट याची माहिती द्यावी लागेल.
  • जर त्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही आक्षेपार्ह माहिती असेल तर ज्याने तो कंटेंट तयार केला अथवा शेअर, अपलोड केला त्यांची माहिती द्यावी लागेल. यासोबतच त्याने ती का अपलोड केली याचे स्पष्टीकरणदेखील द्यावे लागणार आहे. हे वाद मिटवण्याच्या यंत्रणेवर कव्हर्स ऑफिसरने सतत देखरेख केली पाहिजे

आता समस्या कुठे आहे?

केंद्र सरकारने 50 लाखांपेक्षा जास्त वापरकर्त्यांचा वावर असलेल्या मुख्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी 3 महिन्यांचा कालावधी दिला होता. ही गाइडलाईन 25 मे रोजी संपुष्टात येत आहे. भारतीय सोशल मीडिया अॅप कू सोडून ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या कंपन्यांनी आतापर्यंत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.

बातम्या आणखी आहेत...