आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Rules From 1 July 2021 Withdrawals More Than Four Times Will Be Charged By The State Bank Of India

एक जुलैपासून नवे नियम:चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास भारतीय स्टेट बँक शुल्क आकारणार, व्यावसायिकांसाठी टीडीएस नियमांमध्येही बदल होईल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बँकिंगच्या अनेक नियमांमध्ये १ जुलैपासून अनेक बदल होत आहेत. यात सर्वाधिक खातेदार असलेल्या भारतीय स्टेट बँकेचे नियम महत्त्वाचे आहेत. बँक आता महिन्यात चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास शुल्क वसूल करणार आहे. तसेच व्यावसायिकांसाठी टीडीएस नियमांतही बदल लागू होतील. दर महिन्याप्रमाणेच १ जुलैपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होतील.

बँकिंग- एसबीआयतून एक महिन्यात चार वेळा पैसे काढणे :
भारतीय स्टेट बँकेची शाखा असो की एटीएम आता महिन्यात फक्त चार वेळाच रोकड काढता येईल. त्यानंतर प्रत्येक वेळी १५ रुपये आणि जीएसटी शुल्क बँक तुमच्या खात्यातून कापेल. १० पानांचे मोफत भेटणारे चेकबुक आता मोफत भेटणार नाही. बँक यासाठी ४० रुपये शुल्क आणि जीएसटी वसूल करेल. तत्काळ चेकबुक घेतले तर ५० रुपये लागतील. जर चेकबुकद्वारे होम ब्रँचमधूनच पैसे काढले तर त्यांना शुल्कातून सूट दिली जाईल. हा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू नसेल. त्यांना आधी सारखेच चेकबुक मोफत मिळेल. सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलिनीकरण झाले आहे. म्हणून त्यांचा आयएफएससी कोडही १ जुलैपासून बदलत आहे. तसेच कॉर्पोरेशन आणि आंध्र बँकांचे युनियन बँकेत विलिनीकरण झाले आहे. आता या बँकांचे जुने चेकबुक काम करणार नाही. खातेदारांना नवे चेकबुक घ्यावे लागेल. नवीन आयएफएससी कोड वापरावा लागेल.

प्राप्तिकर- ५० लाखांपेक्षा जास्तीच्या व्यावसायिक खरेदीवर टीडीएस कापला जाईल
प्राप्तिकर अधिनियमात नुकतेच सेक्शन- १९४ जोडण्यात आले आहे. हे सेक्शन एखादे साहित्य खरेदी करण्यासाठी आधीपासून निश्चित किमतीवर लागणाऱ्या टीडीएसशी संबंधित आहे. नव्या सेक्शन अंतर्गत ५० लाख रुपयांवरील व्यावसायिक खरेदीवर ०.१० टक्के टीडीएस कापला जाईल. जर गेल्या वर्षी एखाद्या व्यावसायिकाची उलाढाल १० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर या वर्षी तो ५० लाखांपेक्षा जास्तीचे साहित्य घेऊ शकतो. त्यापेक्षा जास्तीच्या विक्रीवर टीडीएस कापला जाईल. १ जुलैपासून २०६ एबी सेक्शनची अंमलबजावणी होईल. या अंतर्गत जर विक्रेत्याने दोन वर्षांपर्यंत प्राप्तिकर परतावा दाखल केला नाही तर हा टीडीएस ५ टक्के होईल. म्हणजे आधी जो टीडीएस फक्त ०.१० टक्के होता, तो पाच टक्के होण्याचा अर्थ टीडीएसचे प्रमाण ५० पट वाढेल. जर मागील आर्थिक वर्षात टीसीएस ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास तरीही टीडीएस कपात ५ टक्के दराने केली जाईल.

वाहन- मारुती, हीरो किमती वाढवणार
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक मारुती सुझुकी इंडियाच्या कार तर हीरोच्या बाइक १ जुलैपासून महागतील. हीरो स्कूटर व मोटारसायकलच्या एक्स शोरूम किमती तीन हजार रुपयांपर्यंत वाढवत आहे. तर मारुतीही त्यांच्या कारची किमती वाढवेल.

इंधन- सिलिंडरच्या किमतीही बदलतील
प्रत्येक महिन्याप्रमाणे १ जुलैपासूनच एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतील. मात्र हे बदल किती असतील हे अद्याप तेल कंपन्यांनी सांगितलेले नाही. मात्र दर वाढणे निश्चित समजले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...