आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New School Sessions Begin; The Era Of Online Education Is Over; According To The Survey, Children Learn Better With Friends Offline

दिव्‍य मराठी रिसर्च:शाळांचे नवे सत्र सुरू, सर्वेक्षणानुसार ऑफलाइनमध्ये मुले मित्रांसोबत अधिक चांगल्या पद्धतीने शिकतात

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्याच्या सुट्या संपल्यात जमा आहेत. काही शाळा सुरू झाल्या आहेत, काही सुरू होणार आहेत. अ‌ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट (असर) २०२१ नुसार, २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे पहिली आणि दुसरीचे जवळपास ३६% विद्यार्थी शाळेत जाऊच शकले नाहीत. दरम्यान, आता कोरोना काळातील सर्व बंधने मागे घेण्यात आली आहेत. त्यामुळे ही मुले आता पहिल्यांदा शाळेत जातील.

ऑनलाइन शिक्षणात अडचणी

असरच्या अहवालानुसार, पहिली ते आठवीपर्यंतच्या ७०.२% शाळांचे म्हणणे आहे की ऑनलाइन शिक्षणात कमी उपस्थिती, तांत्रिक अ़डचणी पालकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शक्षणात खूप अडचणी येतात.

- ६५.४ % शिक्षक म्हणाले, ऑनलाइन शिक्षणादरम्यान ‘समजून घेण्यात असमर्थता’ हे सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक

- राष्ट्रीय सर्व्हेक्षण २०२१ नुसार, ३८% विद्यार्थ्यांना घरात शिकण्यासाठी अडचणी आल्या, २४% म्हणाले की, त्यांच्या घरात डिजिटल उपकरणे नाहीत.

काही मुले तणावग्रस्त
जवळपास दोन वर्षांनंतर पुन्हा शाळेत जाणारी काही मुले अत्यंत आनंदी आहेत, मात्र अशीही काही मुले आहेत जी तणावग्रस्त होत आहेत. अशा मुलांमध्ये सामाजिक चिंतेची (सोशल अँग्झाइटी) लक्षणे आहेत. दिल्लीत अशी काही प्रकरणे समोर आली आहेत. हा एक विकार आहे, वेळीच ओळखून त्यावर उपचार केले जाऊ शकतात,असे डॉक्टर म्हणतात. बराच काळ घरी राहिलेल्या मुलांना शाळेत कसे सामावू, ही भीती आहे.

सोशल अँग्झायटीची लक्षणे

इतरांकडून अपमानित किंवा स्वीकारले न जाण्याची भीती. सार्वजनिक चर्चा किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी न होणे, उलट्या होणे किंवा पोटाचा आजार, डोकेदुखी, थरथरणे, हृदयाचे ठोके वाढणे आदी.

हे करा...

मुलांना छोट्या छोट्या चर्चांमध्ये सहभागी करा. हे सहजपणे होऊ द्या. सकारात्मक राहा. शरीर, मांसपेशींनाही आराम मिळेल, असे व्यायाम करायला लावा. वेगाने, छोटा श्वास घेण्याएेवजी, हळू, खोल श्वास घेतील असा प्रयत्न करा. एकाग्रता शिकवा.

७ वर्षांची मुले समवयस्कांसोबत खेळली तर बौद्धिक आरोग्य सुधारते
तुमच्या कुटुंबात एखादे लहान मूल असेल तर हे अवश्य वाचा. सात वर्षांपर्यंतची मुले जर समवयस्कांसोबत खेळली तर त्यांचा बौद्धिक विकास अधिक चांगला होतो, असे केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासात समोर आले आहे. अशा पद्धतीचे संशोधन पहिल्यांदाच करण्यात आल्याचा दावा आहे. यासाठी संशोधकांना ३ ते वर्षांपर्यंतच्या जवळपास १७०० मुलांच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

शेअरिंग कळते
-संशोधनात सहभागी डॉ. जेनी गिब्सन यांच्यानुसार, समवयस्क मुलांसोबत खेळल्यामुळे ते नाते घट्ट करण्यास लायक होतात, हा गुण मोठे होईपर्यंत राहतो.
-पीएचडीचा विद्यार्थी आणि संशोधनात सहभागी विक्की यिरान म्हणतो की, शेअरिंगचे खेळ खेळल्यामुळे लहान मुलांमध्ये सकारात्मकता विकसित होते.
-एक्सेटर विद्यापीठाचे बाल मनोचिकित्सक प्रोफेसर हेलेन डोड म्हणतात की, यामुळे चांगल्या मानसिक आरोग्याचा पाया रचला जातो, जो आयुष्यभर उपयुक्त ठरतो.

बातम्या आणखी आहेत...