आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहा एक अदृश्य मारेकरी आहे. हृदयाचे ठोके अनियमित होतात तेव्हा रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. वैद्यकीय भाषेत हे अॅट्रियल फायब्रिलेशन आहे. एकट्या ब्रिटनमध्ये दरवर्षी दहा लाखांहून अधिक लोकांचा बळी जातो. उपचारउुपलब्ध असते तर बहुतांश लोकांचे प्राण वाचू शकले असते. रोगाच्या चाचण्या महाग आणि अस्पष्ट आहेत. पण, लवकरच ते अॅपल वॉच आणि फिटबिट्सद्वारे ओळखणे शक्य होणार आहे. वैद्यकीय शास्त्रात होत असलेल्या बदलांचे हे उदाहरण आहे. स्मार्ट घड्याळे, अंगठ्या, फिटनेस ट्रॅकर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे शारीरिक स्थिती आणि वर्तनातील ७५०० पर्यंत बदल नोंदवू शकतात. अॅपलने २०१५ मध्ये पहिले घड्याळ लाँच केले. त्याच्या सहा वर्षांपूर्वी फिटबिट्सच्या फिटनेस ट्रॅकरची विक्री होत होती. आरोग्याशी निगडित ५०० पेक्षा जास्त वेअरेबल उपकरणे बाजारात होती. सीसीएस इनसाइट मार्केट रिसर्च कंपनीच्या मते, २०१५ मध्ये स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्सची विक्री ६१,४७९ कोटी रुपयांची होती. आता २०२१ मध्ये जगभरात वेअरेबल उपकरणांवर २.२२ लाख कोटी रुपये खर्च केले गेले. कोविड-१९ महामारीमुळे अंगावर घालण्यायोग्य आरोग्य, फिटनेस उपकरणांचा वापर वाढला आहे. गार्टनर या रिसर्च फर्मचे रणजित अटवाल सांगतात की, महामारीपूर्वी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला डिस्पोजेबल मानले जात होते. आता मोठ्या संख्येने लोकांनी केवळ उपक्रमच नव्हे, तर त्यांच्या आरोग्याशी संबंधित विशिष्ट स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी या उपकरणांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि युरोपमधील डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णांची माहिती मिळवण्यासाठी वेअरेबल उपकरणांचे चार्ट पाहण्यास सुरुवात केली आहे. परिधान करण्यायोग्य उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तीन मोठ्या मार्गांनी आरोग्य सेवेत बदल घडवून आणण्यासाठी सज्ज आहेत- लवकर निदान, विशेष वैयक्तिक उपचार आणि असाध्य रोगांचे नियंत्रण. यामुळे खर्च कमी होईल आणि जीव वाचतील. वेअरेबल उपकरणे सामान्यतः लक्षात न येणारे किरकोळ बदल शोधू शकतात. वृद्ध व्यक्तीचे संतुलन बिघडू लागले तर पार्किन्सन्स या आजाराची प्राथमिक स्थिती कळते. स्मार्टफोनच्या वापराने मानसिक स्थितीचे निदान करता येते. स्मार्ट रिंग महिलेची गर्भधारणा ओळखेल. वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या उपचारांची शक्यतादेखील वाढेल. बहुतांश औषधे ३० ते ५०% रुग्णांवर परिणामकारक असतात. वेअरेबल डिव्हाइसच्या डेटावरून तयार करण्यात आलेल्या अल्गोरिदममुळे लोकांच्या गरजेनुसार वजन कमी करणे, मधुमेहावर नियंत्रण यांसारखी औषधे देणे शक्य होणार आहे. प्रत्येकाला समान सरासरी उपचारांची आवश्यकता पडणार नाही. जर्मनीतील एका चाचणीत लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवल्याने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले. रुग्णांच्या रुग्णालयात राहण्याचे दिवस एकतृतीयांश कमी झाले. वेअरेबल उपकरणांमुळे मधुमेहासारख्या कायमस्वरूपी आजारांमध्ये परिस्थिती सुधारेल. जीवनशैलीत बदल असलेल्या ८०% लोकांना मधुमेह टाळणे शक्य आहे. लोक कसे चालतात, काय खातात आणि कसे झोपतात याची माहिती देऊन छोटी उपकरणे सुधारणेचा मार्ग मोकळा करतात. नवनिर्मितीसाठी स्मार्टफोन चांगले व्यासपीठ आहे. एक-दोन वर्षांत मनगटातील उपकरण रक्तातील साखर, अल्कोहोल व पाण्याची स्थिती ट्रॅक करू शकेल. ते मूत्रपिंड आणि यकृताच्या स्थितीबद्दलही माहिती देतील. यासाठी शरीरातून रक्त काढण्याची गरज नाही. कोणत्याही तंत्रज्ञानाप्रमाणे घालण्यायोग्य उपकरणेदेखील चिंतेचे कारण बनतात. आरोग्यासंबंधी माहिती अमूल्य आहे. डिव्हाइस निर्माते, विमा कंपन्या किंवा सामाजिक नियंत्रणांमध्ये स्वारस्य असलेले सरकार त्यांचा गैरवापर करू शकतात. © 2019 The Economist Newspaper Limited. All rights reserved
२०२६ पर्यंत ४० कोटी उपकरण विक्रीचा अंदाज मोबाइल फोन्सप्रमाणेच अमेरिकेत स्मार्टवॉचची विक्री वाढत आहे. २०२१ मध्ये चारपैकी एका अमेरिकनकडे स्मार्ट घड्याळ किंवा फिटनेस ट्रॅकर होता. अमेरिका आणि फिनलंडसारख्या युरोपियन देशांत हाच दर आहे. २०२१ मध्ये उत्तर अमेरिकेत वेअरेबल उपकरणांची विक्री २०१५ च्या तुलनेत दुप्पट, तर पश्चिम युरोप व चीनमध्ये तिप्पट झाली. २०१९ मध्ये अॅपलने संपूर्ण स्विस घड्याळ उद्योगापेक्षा अधिक स्मार्ट घड्याळे विकली. २०२६ पर्यंत सर्व ब्रँडच्या ४० कोटी उपकरण विक्रीचा अंदाज आहे. २०२० मधील २० कोटींच्या तुलनेत हे दुप्पट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.