आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बंगळुरुत ऑर्डर कँसल केल्यामुळे तरुणीवर हल्ला केल्याच्या आरोपात झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयला बुधवारी अटक करण्यात आले होते. पण, या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. डिलीव्हरी बॉय कामराजने याबाबत आपली बाजून मांडली आहे. त्याचा दावा आहे की, त्या तरुणीने स्वतः आपल्या चेहऱ्यावर मारुन घेतले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कंटेंट क्रिएटर हितेशा चंद्रानीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करुन झोमॅटो डिलीव्हरी बॉयने तिला मारल्याचा आरोप केला आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणत चांगलेच तापले. यानंतर पोलिसांनी त्या डिलीव्हरी बॉयला अटक केले. पण, आता यात नवीन ट्विस्ट आला आहे.
डिलीव्हरी बॉयने मांडली बाजू
कामराजने सांगितले की, "ट्रॅफिक असल्यामुळे मला पार्सल पोहचवण्यास उशीर झाला. याबाबत मी त्या तरुणीची माफी मागितली. पण, तिने माझ्याशी भांडण सुरू केले आणि पैसे देणार नसल्याचे सांगितले. यानंतर मी तिला ते पार्सल परत करण्यास सांगितले, पण तिने दिले नाही. यावेळी तिने मला चप्पलने मारण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तिचा हातच तिच्या नाकावर बसला आणि बोटात असलेल्या अंगठीमुळे नाकातून रक्तस्राव झाला."
म्हणणे ऐकल्यानंतर बाजूने आले अनेक लोक
डिलीव्हरी बॉयचे म्हणणे ऐकल्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण त्याच्या बाजूने बोलत आहेत. यूथ अगेंस्ट रेपने ट्वीट केले, "आम्हाला माहित नाही की, नेमकी घटना काय आहे. पण, झोमॅटोने या घटनेनंतर तडकाफडकी त्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढले. आता या प्रकरणाची सत्यता समोर येणे अवघड आहे."
यानंतर झोमॅटोने स्पष्टीकरण देताना म्हटले की, आम्ही त्या डिलीव्हरी बॉयच्या संपर्कात आहोत. त्याला पोलिस कारवाई पूर्ण होईपर्यंत सस्पेंड केले आहे. या वादावर झोमॅटोचे फाउंडर दीपेंद्र गोयल यांनी म्हटले की, आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जात आहोत. आम्ही हितेशा आणि कामराजच्या संपर्कात आहोत आणि तपास पूर्ण होईपर्यंत पूर्ण मद करू. आम्ही कामराजच्या कामाची पूर्ण माहिती घेतली आहे. त्याने आपल्या झोमॅटो करिअरमध्ये 5 हजारांपेक्षा जास्त डिलीव्हरी केल्या आहेत आणि त्याची रेटिंग खूप चांगली आहे. त्यामुळे आम्ही त्याला पूर्ण कायदेशीर मदत पुरवत आहोत आणि या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.