आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषाणू:6 देशांत कोरोनाचे नवे स्वरूप, ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना 31 डिसेंबरपर्यंत बंदी, व्हायरसचा नवा प्रकार 70% वेगाने फैलावतोय

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळला आहे. तो नेदरलँड, डेन्मार्क, इटली, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेतही आढळला आहे. त्याचा ७०% अधिक वेगाने प्रसार होत आहे. हा धोका बघून भारत सरकारने इंग्लंडमधून येणाऱ्या सर्व विमानांना २२ डिसेंबर रात्री ११:५९ वाजेपासून ते ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे. २२ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत इंग्लंडहून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. निगेटिव्ह येणाऱ्यांनाही गृह विलगीकरणात राहावे लागेल.

कोरोनाच्या नव्या स्वरूपामुळे चिंता वाढली आहे. यामुळे आतापर्यंत १८ देशांनी इंग्लंडमधून येणाऱ्या उड्डाणांना बंदी घातली आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, घाबरण्याची गरज नाही. सरकार सजग आहे. हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटले आहे की, २३ ते ३१ पर्यंतची बुकिंग रद्द होईल. पैसे परत दिले जातील.

नवे स्वरूप पुढे कमकुवत होईल की घातक, अद्याप अभ्यास नाही
विषाणू स्वरूप बदलत असतो. बहुतांश आपोआप नष्ट होतात. मात्र, कधी-कधी तो आधीपेक्षा जास्त धोकादायक होतो. ही प्रक्रिया एवढ्या वेगाने होते की पहिले रूप शास्त्रज्ञांच्या लक्षात येण्याआधीच दुसरे रूप समोर येते. कोरोनाच्या या नव्या प्रकाराला व्हीयूआय-२०२०१२/०१ असे नाव आहे. तो आधीपेक्षा ७०% जास्त संक्रामक आहे.

असे आधीही झाले आहे?
हो. जगात पहिल्यांदा वुहानमध्ये आढळलेला विषाणू जगभरात आढळलेल्या विषाणूपेक्षा वेगळा होता. डी ६१४ जी प्रकारचा विषाणू फेब्रुवारीमध्ये युरोपात आढळला होता. सध्या तोच जगभरात सर्वाधिक आहे. ए२२२ व्ही आणखी एक प्रकार असून तो युरोपात पसरला. स्पेनमध्ये उन्हाळ्याच्या सुटीसाठी गेलेल्यांमुळे तो पसरला होता.

नवीन प्रकार कुठून आला?
इंग्लंडमध्ये आढळत असलेल्या विषाणूत खूप बदल झाले आहेत. बहुतेक तो एखाद्या रुग्णाच्या शरीरात तयार झाला असावा, त्याची प्रतिकारशक्ती खूप कमकुवत असावी व विषाणूला मारू शकत नसावी. अशा रुग्णांच्या शरीरात या विषाणूने मजबूत होत आपले रूप बदलले असावे.

नवीन स्वरूप वेगाने का फैलावत आहे?
एम्स दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यानुसार, व्हायरसचे नवे रूप मानवी कोशिकांना जास्त वेगाने चिटकतो.यामुळे तो वेगाने फैलावत आहे.

नवे स्वरूप पुढे घातक असेल की कमकुवत?
इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रा. क्रिस विट्टीनुसार, विषाणूचा हा नवा प्रकार जास्त घातक आहे की नाही याचे पुरावे नाहीत.

नव्या प्रकारावर लसीचा परिणाम किती?
आयसीएमआरचे माजी वैज्ञानिक डाॅ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या नव्या स्वरूपावर लस प्रभावी ठरेल. कारण, प्रोटीन आधारित लस विविध प्रकारच्या अँटीबॉडी तयार करते. एक प्रोटीन खराब झाले म्हणजे, सर्वच खराब होतील, असे नाही. भारत बायोटेक व स्पुटनिक-व्ही लस असक्रिय व्हायरसपासून बनलेली आहे. यामुळे ती नव्या स्वरूपावर प्रभावी ठरेल. इंग्लंडच्या ग्लास्गो विद्यापीठातील प्रा. डेव्हिड रॉबर्टसन यांच्यानुसार, ‘लसीपासून बचाव करता येईल, असा बदलही हा विषाणू करून घेऊ शकतो. असे झाले तर लस नियमितपणे अपडेट करावी लागते. मात्र आता लसीला अपडेट करणे खूप सोपे झाले आहे.’

बातम्या आणखी आहेत...