आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • New Video Of Morbi Bridge Accident, People Were Hanging On The Rope And Asking For Help, Cried In The Middle Of The River

मोरबी पूल दुर्घटनेचा नवा VIDEO:दोरीला लटकून मदत मागत होते लोक, नदीच्या मधोमध केला आक्रोश

लेखक: मोरबी से रक्षीत, जीग्नेश और आनंदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी झालेल्या पूल दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पुलाच्या तुटलेल्या भागात अनेक जण दोरीच्या साहाय्याने लटकलेले दिसत आहेत. काही लोक नदीच्या पाण्यात बुडणार आहेत. आजूबाजूला मदतीसाठी आरडाओरड सुरू आहे. दुसरीकडे, मोरबी दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येथे पोहोचले. त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर त्यांनी एसपी कार्यालयात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांची त्यांनी भेट घेतली. पंतप्रधानांनी येथील अधिकाऱ्यांची बैठकही घेतली. मोरबी येताच पंतप्रधानांनी प्रथम घटनास्थळी जाऊन मच्छू नदीवरील तुटलेल्या पुलाची पाहणी केली. 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या मोरबी येथील पूल दुर्घटनेत आतापर्यंत 135 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतदेहांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफच्या म्हणण्यानुसार आणखी 2 मृतदेह नदीत अडकले असण्याची शक्यता आहे. 125 जणांचे पथक आणि 12 बोटींतून पाणबुडे शोध घेत आहेत. राज्यात आज एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

पीएम मोदींनी अपघातस्थळाची पाहणी केली. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी त्यांना या घटनेची माहिती दिली.
पीएम मोदींनी अपघातस्थळाची पाहणी केली. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी त्यांना या घटनेची माहिती दिली.
पीएम मोदींनी मोरबी दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
पीएम मोदींनी मोरबी दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
पीएम मोदींनी मोरबी येथील एसपी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून सर्व बाबी तपासण्यात याव्यात, असे ते म्हणाले.
पीएम मोदींनी मोरबी येथील एसपी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून सर्व बाबी तपासण्यात याव्यात, असे ते म्हणाले.
पीएम मोदींनी मोरबी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पीएम मोदींनी मोरबी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पीएम मोदींनी रुग्णालयात दाखल असलेल्या काही रुग्णांशीही संवाद साधला.
पीएम मोदींनी रुग्णालयात दाखल असलेल्या काही रुग्णांशीही संवाद साधला.
पीएम मोदींनी मोरबी हॉस्पिटल परिसरात मदत आणि बचाव कार्यात सहभागी असलेल्या जवानांचीही भेट घेतली.
पीएम मोदींनी मोरबी हॉस्पिटल परिसरात मदत आणि बचाव कार्यात सहभागी असलेल्या जवानांचीही भेट घेतली.
पीएम मोदींनी बचाव कार्यात सहभागी लोकांशी संवाद साधला आणि अपघाताची माहिती घेतली.
पीएम मोदींनी बचाव कार्यात सहभागी लोकांशी संवाद साधला आणि अपघाताची माहिती घेतली.
अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

मोरबी दुर्घटनेचे मोठे अपडेट्स...

  • पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. यावर 14 नोव्हेंबरला कोर्टात सुनावणी होणार आहे.
  • एनडीआरएफने सांगितले - आम्हाला संशय आहे की काही मृतदेह नदीच्या तळाशीदेखील असू शकतात. आम्ही पाणबुड्यांना बोलावून शोधमोहीम पुन्हा सुरू केली आहे.
  • पुलाची देखभाल करणाऱ्या ओरेवा कंपनीचे दोन व्यवस्थापक, पुलाची दुरुस्ती करणारे दोन कंत्राटदार, दोन तिकीट क्लर्क आणि तीन सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आली आहे.
  • मोरबी दुर्घटनेनंतर अहमदाबादमधील अटल पुलावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 1 तासात फक्त 3,000 लोक इथे जाऊ शकतील. तो बनवणाऱ्या कंपनीने पुलाची क्षमता 12 हजार असल्याचा दावा केला आहे.

मोरबी दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी सकाळची तीन छायाचित्रे...

नौदल आणि एनडीआरएफने सलग तिसऱ्या दिवशीही आपले ऑपरेशन सुरूच ठेवले.
नौदल आणि एनडीआरएफने सलग तिसऱ्या दिवशीही आपले ऑपरेशन सुरूच ठेवले.
हे दृश्य मंगळवारी सकाळचे आहे. यामध्ये मोरबीचा तुटलेला झुलता पूल आणि दुर्घटनेच्या खुणा दिसत आहेत.
हे दृश्य मंगळवारी सकाळचे आहे. यामध्ये मोरबीचा तुटलेला झुलता पूल आणि दुर्घटनेच्या खुणा दिसत आहेत.
दीपक पारेख, दिनेश दवे, मनसुख टोपिया, मादेव सोळंकी, प्रकाश परमार, देवांग, अल्पेश गोहिल, दिलीप गोहिल, मुकेश चौहान यांना अटक करण्यात आली. हे फोटो आता समोर आले आहेत.
दीपक पारेख, दिनेश दवे, मनसुख टोपिया, मादेव सोळंकी, प्रकाश परमार, देवांग, अल्पेश गोहिल, दिलीप गोहिल, मुकेश चौहान यांना अटक करण्यात आली. हे फोटो आता समोर आले आहेत.

4 मुद्द्यांत समजून घ्या मोरबी दुर्घटना, कारवाई आणि बचाव...

1. जबाबदारी कोणाची, कारवाई काय झाली

पुलाच्या देखभालीची जबाबदारी ओरेवा ग्रुपकडे आहे. या ग्रुपने मार्च 2022 ते मार्च 2037 पर्यंत 15 वर्षांसाठी मोरबी नगरपालिकेसोबत करार केला आहे. हा ग्रुप पुलाची सुरक्षा, स्वच्छता, देखभाल, टोल वसुली, कर्मचारी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतो. एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती अपघाताची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करेल. याप्रकरणी जबाबदार व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये ओरेवा कंपनी किंवा तिच्या मालकाचे नाव नाही.

येथे तिकिटांसाठी जास्त पैसे घेतले जात होते. नफ्याच्या लालसेपोटी तिकीट विक्रेत्यांनी क्षमतेपेक्षा जास्त लोकांना तिकिटे दिली. पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले आहे.

2. बचाव

एसडीआरएफ, एनडीआरएफ, आर्मी आणि एअर फोर्सचे पथक रात्रीच पोहोचले होते. याशिवाय जामनगर म्हणजे 100 किमी हवाई दलाचे 50 गरुड कमांडोही दूरवरून आले. सोमवारी सकाळी एनडीआरएफ अधिकाऱ्याने सांगितले की, काही मृतदेह पुलाखाली अडकले असावेत. गढूळ पाण्यामुळे लोकांना शोधणे कठीण झाले. बचाव नौका, जलतरणपटू, पाणबुडे याशिवाय डझनभर पथके या कारवाईत गुंतलेली होती.

3. मदत

राज्य आणि केंद्र सरकारने अपघातग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. केंद्रातर्फे मृतांच्या आश्रितांना दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख आणि जखमींना 50 हजारांची मदत दिली जाईल.

4. आरोप

निवडणुकीच्या घाईत भाजपने हा पूल जनतेसाठी लवकर खुला केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हा पूल उघडल्यानंतर अवघ्या 5 दिवसांतच कसा कोसळला. याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

143 वर्षांहून अधिक जुना आहे पूल

मोरबीचा हा झुलता पूल 143 वर्षे जुना असून त्याची लांबी 765 फूट आहे. हा झुलता पूल केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी सुमारे साडेतीन लाख खर्चून तो पूर्ण झाला होता. त्यावेळी हा पूल बनवण्याचे सर्व साहित्य इंग्लंडमधूनच आयात करण्यात आले होते. तेव्हापासून या पुलाचे अनेकवेळा नूतनीकरण करण्यात आले. नुकतेच दिवाळीपूर्वी दोन कोटी रुपये खर्चून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.

मोरबीचे राजा या पुलावरून दरबारात जायचे

मोरबीचे राजा प्रजावत्सल सर वाघजी ठाकोर यांच्या संस्थानकाळात हा पूल बांधण्यात आला होता. त्यावेळी राजवाड्यातून राजदरबारात जाण्यासाठी राजा या पुलाचा वापर करत असे. राजेशाही संपल्यानंतर या पुलाची जबाबदारी मोरबी नगरपालिकेकडे सोपवण्यात आली होती.

मोरबी दुर्घटनेचा देशभरात शोक, 2 फोटो...

वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीदरम्यान मोरबी दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना भाविकांनी श्रद्धांजली वाहिली.
वाराणसीतील दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीदरम्यान मोरबी दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना भाविकांनी श्रद्धांजली वाहिली.
जम्मू येथील शिक्षा निकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोरबी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
जम्मू येथील शिक्षा निकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोरबी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली.

दुर्घटनेचे सर्वात दुःखद चित्र...

सोमवारी सकाळी समोर आलेले हे चित्र मोरबी जिल्हा रुग्णालयातील आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह येथे ठेवण्यात आले. रुग्णालयाचा संपूर्ण कॉरिडॉर मृतदेहांनी भरला होता.
सोमवारी सकाळी समोर आलेले हे चित्र मोरबी जिल्हा रुग्णालयातील आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह येथे ठेवण्यात आले. रुग्णालयाचा संपूर्ण कॉरिडॉर मृतदेहांनी भरला होता.
बातम्या आणखी आहेत...