आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Welcome 2021
 • New Year 2020 Celebrations In India; Celebrations In Goa Shimla Mumbai To Bengaluru Mysore Palace

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात नवीन वर्षाची तयारी:बंगळुरूमध्ये न्यू ईयर पार्ट्यांवर बंदी; मुंबई, शिमला आणि मनालीत नाइट कर्फ्यूने उत्सवाच्या तयारींवर फेरले पाणी

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • गोव्यात कडक निर्बंध नाहीत, मात्र नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करणे पडणार महागात
 • अनेक मोठ्या शहरांमध्ये रात्री बाहेर पडण्यावर बंदी, घरात करावे लागणार सेलिब्रेशन

देशात यावेळेस नवीन वर्ष साजरा करणे सोपे होणार नाही. न्यू इयर ग्रँड सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध असलेले मुंबई, बंगळुरू, म्हैसूर आणि पुदुच्चेरीमध्ये नवीन वर्षांचे ते चित्र दिसणार नाही, जे त्याच्या सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध आहे. गोव्यामध्ये कमीतकमी निर्बंध आहेत, परंतु इथल्या महागाईच्या दरम्यान नवीन वर्ष साजरे करणे सोपे असणार नाही.

जाणून घ्या, नवीन वर्ष साजरा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देशभरातील शहरे, तेथील परिस्थिती आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कसे असेल

म्हैसूर : आतषबाजीने चमकणारे म्हैसूर पॅलेस यावर्षी निर्जन असेल

 • कर्नाटकातील म्हैसूर पॅलेसमध्ये दरवर्षी 24 डिसेंबरपासून हिवाळी महोत्सव सुरू होतो. आतषबाजी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात, मात्र यावर्षी प्रशासनाने हिवाळी महोत्सवावर पूर्णपणे बंदी घातली आहे. म्हैसूर हॉटेल ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. नारायण गौडा यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी म्हैसूरमधील कोणतेही मोठे हॉटेल नवीन वर्षाच्या पार्टीसाठी तयारी करत नाहीयेत. कर्नाटकमध्ये 23 डिसेंबरपासून नाईट कर्फ्यू लागू आहे, जो 2 जानेवारीपर्यंत राहणार आहे.

गोवा : येथे कडक निर्बंध नाहीत, न्यू ईयरनिमित्त 10 भव्य पार्ट्यांचे नियोजन

 • आपण गोव्यात नवीन वर्ष साजरा करू शकता, कारण येथे प्रशासनाकडून कोणतेही कठोर निर्बंध लागू नाहीत. गोव्यात दरवर्षी 31 डिसेंबर रोजी 30 मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी केवळ 10 पार्ट्यांचे नियोजन असणार आहे. कोरोना काळात कोणत्याही बंधनाशिवाय नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोवा हे यंदाचे उत्तम ठिकाण आहे.
 • पुण्यातील ट्रॅव्हल एजन्सी श्री विनायक हॉलीडेजचे मालक संतोष गुप्ता यांच्या नुसार, नवीन वर्षासाठी गोवा, महाबळेश्वर आणि लोणावळाकडे जाणाऱ्या कॅबमध्ये 40% पर्यंत वाढ झाली आहे. ट्रॅव्हल कंपनी गो आयबीबोने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात दिसले की 60% भारतीयांना समुद्रकिनारे किंवा टेकड्यांसह पर्यटनस्थळांवर नवीन वर्ष साजरे करण्याची इच्छा आहे.

शिमला-मनाली : पार्टीविना साजरे करावे लागणार नवीन वर्ष, नाइट कर्फ्यूत 1 तासाची सूट

 • हिमाचल प्रदेशात शिमला, मंडी, कांगडा आणि कुल्लूमध्ये 5 जानेवारीपर्यंत नाइट कर्फ्यू लागू राहणार आहे. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत नाइट कर्फ्यू होता, मात्र ख्रिसमसपूर्वी यामध्ये एका तासाची सूट दिली आहे. आता रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. येथे सर्व प्रकारच्या सार्वजनिक मेळाव्यावर बंदी आहे. जर आपण नवीन वर्ष साजरे करण्यासाठी शिमला किंवा मनालीला जात असाल तर आपण डोंगरांमध्ये शांततेत क्षण घालवू शकता, परंतु आपल्याला नवीन वर्षाची पार्टी साजरी करता येणार नाही.

मुंबई : मायानगरीत नाइट कर्फ्यूत होणार नवीन वर्षाची सुरुवात

 • मुंबईत नवीन वर्षाची सुरुवात नाइट कर्फ्यूत होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत रेस्तराँ, हॉटेल आणि फूट पार्क बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळल्यानंतर 21 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री 8 च्या आधी जास्तीत जास्त 50 लोक एका ठिकाणी एकत्र येऊ शकतात.
 • पुण्यातही नवीन वर्षाची ग्रँड पार्टी पाहायला मिळणार नाहीत. पुण्यातील असोसिएशन ऑफ क्लबचे अध्यक्ष म्हणाले की, 31 डिसेंबर रोजी सर्व क्लब संचालक सामाजिक अंतर पाहता मोठी पार्टी आयोजित करण्याचे टाळत आहेत.

बंगळुरू : नवीन वर्षाच्या उत्सवावर बंदी, रात्री घरातूनही बाहेर पडता येणार नाही

 • एमजी रोड, ब्रिगेड रोड आणि चर्च मार्गावर होणारे सेलिब्रेशन बंगळुरूच्या न्यू ईयरची ओळख आहे. यावर्षी या तिन्ही जागा कोरोनरीमध्ये निर्जन असतील. बेंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त मंजुनाथ प्रसाद म्हणाले की यावर्षी पब आणि रेस्टॉरंट्समधील सर्व न्यू ईयर सेलिब्रेशनवर पूर्णपणे बंदी राहणार आहे. कर्नाटक सरकारनेही राज्यात ख्रिसमस आणि न्यू इयर पार्ट्यांवर बंदी घालण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. येथे 23 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत नाईट कर्फ्यू लागू राहील. केवळ आवश्यक कार्यक्रम होतील, यामध्येही कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे.

पुदुच्चेरी : नियमांमध्ये बांधलेल्या राहतील पार्ट्या, मोकळ्या जागांवरच साजरे होणार उत्सव

 • पुदुच्चेरीच्या बीच रस्त्यांवर होणाऱ्या नवीन वर्षाच्या पार्ट्या स्थानिक लोक तसेच मोठ्या संख्येने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. प्रशासनाने या पार्ट्यांसाठी नवीन गाइडलाइन लागू केली आहे. सर्व बीच पार्टीच्या आयोजकांना उत्सवांमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची संख्या कमीत कमी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या पार्ट्या मोकळ्या जागांवर आयोजित केली जावीत असेही सांगण्यात आले आहे.
 • येथे ओपन पार्ट्यांमध्ये मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान केवळ नवीन वर्षच नव्हे तर सेनी पेरची आणि पोंगलसारखे सणही कडक निर्बंधामध्ये साजरे केले जातील, असे मुख्यमंत्री व्ही. नारायण स्वामी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...