आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नव वर्षाची भेट, रतन टाटांची विशेष मुलाखत:'प्रेरित तरुणाई राष्ट्रशक्ती, आपणास प्रेरणा व प्रयत्नांच्या सिंचनावर भर द्यावा लागेल'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नववर्षात इतरांच्या विचारांप्रति समज आणि सहिष्णुता आपली ताकद

नववर्षानिमित्त टाटा ग्रुपचे चेअरमन एमिरेट्स रतन टाटा यांनी दिव्य मराठीच्या वाचकांना विशेष संदेश दिला आहे. दिव्य मराठी नेटवर्कचे रितेश शुक्ल यांच्याशी तासाभराहून अधिक वेळ केलेल्या चर्चेत २०२१ ची उमेद, आपली शक्ती आणि चिंतांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. या चर्चेतील टाटांचे मौलिक विचार आपल्यासाठी...

प्रेरित तरुणाई राष्ट्राची शक्ती
अापल्याला काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्याची आवश्यकता आहे.अखेर सध्या जगभरातील अव्वल कंपन्यांचे नेतृत्व भारतीय वंशाच्या व्यक्तींकडे का आहे? दुसरा प्रश्न, या निवडक लोकांनंतर भारतवंशीयांची संख्या जास्त का दिसत नाही? टॉपवर पोहोचलेल्या अनेक लोकांनी त्याच संस्थेत कनिष्ठ स्तरापासून काम सुरू केले होते. कदाचित अव्वल पदावर संधी कमी हे कारण अाहे. दुसरीकडे, भारतीय लोक रोजगार प्राप्त करण्यातही मोठ्या प्रमाणात अपयशी ठरतात याचे कारण काय? इतिहास साक्ष आहे की, जे लोक नव्या काळात निर्माण झालेल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात ते पुढे जातात. अशा स्थितीत आपल्याकडे सर्जनशीलतेला प्रोत्साहन देता येईल यासाठी व्यवस्था आणि वातावरण आहे का, यावर लक्ष देण्याची गरज आहे. तरुणाई नवोन्मेषाचा विचार करू शकेल आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी साहस आणि सहकार्य देता येईल, असे तरुणाईसाठी वातावरण आहे. प्रदूषणाच्या समस्येवर बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची कल्पना आली आणि सध्या ती प्रत्यक्षात आली. यश-अपयशापेक्षा पुढे जाऊन जोवर रचना शैली, प्रयोगशीलता आणि सहकार्याला महत्त्व मिळणार नाही तोवर तरुणाई नावीन्याच्या मार्गावर कसे जाईल? मला वाटते की, प्रेरित तरुणाई देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. प्रेरणा आणि प्रयत्न संरक्षित करणे आमचे उद्दिष्ट असले पाहिजे. उर्वरित सर्व ईश्वरावर सोडले पाहिजे.

नववर्षात इतरांच्या विचारांप्रति समज आणि सहिष्णुता आपली ताकद
कोविडकाळाच्या सुरुवातीला वाटले की, ईश्वराने विश्रांतीची संधी दिली आहे. मात्र, जसजसा काळ लोटला स्थिती बदलत गेली. आठवड्यातील सर्व दिवस आणि सर्व आठवडे एकसारखेच दिसू लागल्याने आपणाला कामातून मिळणाऱ्या समाधानाचा स्तर घटला. रविवार आणि सोमवारमध्ये फरक करणे कठीण ठरले. दररोज रात्री झोप येण्याआधी दिवसाचा विचार केला तेव्हा जेवढे करू शकत होतो तेवढे करू शकलो नाही. ही स्थिती कधी बदलेल... खरे सांगायचे तर या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. एखाद्याला उत्तर हवे आहे, असे कोणी म्हणत असेल तर तो खोटे बोलतो असे समजा. वर्ष बदलत आहे आणि मला विचाराल तर मी म्हणेन, स्वत:साठी नववर्षात इतरांचे विचार समजण्याची चांगली बुद्धी ईश्वराकडे मागेन. दुसऱ्यांचा दृष्टिकोन समजून घेणे आणि त्यांच्याप्रति सहिष्णुता ठेवणे आपली शक्ती आहे.

महारोगराई अशी शक्ती आहे, जिचा आदर करत सामना करावा लागेल
जगात वेगवेगळी चक्रे चालतात. बिझनेस चक्र, आरोग्य चक्र... महारोगराई चक्र. काळानुरूप एखादे चक्र वर गेल्यावर ते इतरांवर वरचढ झाल्यासारखे वाटते. मात्र, हे सदैव नसते. एक काळ होता, जेव्हा एचआयव्ही मानव जातीला घेऊन जाईल असे वाटायचे. मात्र, तसे झाले नाही. मला वाटते कोविडच्या प्रश्नातही आपण असेच काहीसे उत्तर शोधल्यास किमान विषाणूची मारक क्षमता बऱ्याच अंशी कमी होईल. तुम्ही विपरीत तर्क मांडाल, मात्र तो योग्यही होऊ शकतो. अखेर ब्रिटन आणि युरोपमध्ये लोकांनी कोविडचा परिणाम नाकारला होता. मात्र, आज तिथे नव्याने लॉकडाऊन आहे. मी खूप आशावादी नाही ना निराशावादी होऊ इच्छितो. स्वच्छता राहावी, मास्कचा वापर होत राहावा यासाठी मी सतर्क राहू इच्छितो. हा विषाणू खूप शक्तिशाली आहे याची जाणीव होऊ शकेल यासाठी आपल्याला नम्र होण्याची आवश्यकता आहे. याचा अर्थ हा नव्हे की, आपण अंधश्रद्धाळू होऊ. मी एवढेच म्हणेन की, या स्थितीचा आदर करत सामना करण्याची गरज आहे.

कौशल्यातून बेरोजगारी दूर होईल...
सर्वसाधारणपणे असे बोलले जाते की, जॉब मार्केटमध्ये अकुशल, अर्धकुशल आणि उच्च कुशल लोक आहेत. मात्र, स्वयंचलनामुळे एक असे क्षेत्र पुढे आले, ज्यासाठी उपयोगी कौशल्य, एखाद्या पदवी वा पदविकेवर अवलंबून नाही. मला वाटते की, आपण ज्यांना स्थलांतरित मजूर म्हणतो, त्यांच्याकडेही विशिष्ट पद्धतीचे कौशल्य आहे. मात्र ते अशा दूषित वातावरणात आहेत, ज्यात त्यांचे श्रम सुरक्षित नाहीत. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका जेव्हा सहभागी झाला तेव्हा लष्करी उपकरण उद्योग तेथील गृहिणींनी सांभाळला. १९७० च्या दशकात जेव्हा तंत्रज्ञान शिखरावर होते तेव्हा इलेक्ट्रॉनिक सर्किट होते. तेव्हा चीनच्या महिलांनी मायक्रोस्कोपमध्ये पाहत वेगाने सर्किट जोडले आणि ही क्रिया रोबोने दहापट वेगाने काम सुरू केले तोवर सुरू होती. विचारण्याजोगा प्रश्न हा की, वास्तवात बेरोजगारी आहे का? जिथे कौशल्याला संधी मिळणार नाही तिथे बेरोजगारी आहे. आपल्याला असे नेतृत्व हवे जे हा संकल्प घेऊन मैदानात उतरले की, कामाच्या गरजेनुसार लोकांच्या काही भागांना प्रशिक्षित केले जाऊ शकेल. आज सरकार कौशल्य विकासाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करत आहे. मात्र कौशल्य प्राप्त केल्यानंतर लोक स्वदेशात की इतर देशात स्थिरावतील, हा मोठा प्रश्न आहे. कारण नर्सिंग आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियनच्या क्षेत्रात हेच तर सुरू आहे.

अपयशातही गुंतवणूक करण्याचे धाडस आपल्याला करावे लागेल
एकेकाळी टाटा, बिर्ला किंवा मोठ्या औद्योगिक घराण्याच्या कार्यप्रणालीचे अनुसरण करणे अतिशय कठीण काम होते. आज मात्र अनेक स्टार्टअप्सचे उत्तम उदाहरण समोर येत आहे. उदाहरणार्थ मी एका स्टार्टअपसोबत काम करत आहे. यातून मला खूप काही शिकायला मिळत आहे. मात्र या ज्ञानाचा मी प्रत्यक्षात उपयोग करू शकलेलो नाही. अशा स्थितीमध्ये आपण अपयशातून शिकण्याची संधी गमावत असतो. अपयशाकडे मैलाचा दगड म्हणून बघावे लागेल. भारतात आता अपयशातही गुंतवणूक करण्याचे धाडस करावे लागेल.

लष्कर, उद्योगात महिला पुढे
महिला मोठ्या संख्येने राष्ट्राध्यक्ष होतील. त्यांच्या खांद्यावर अनेक कंपन्यांच्या धुरा असेल, याचा कुणीही कधीही विचार केलेला नव्हता. नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेषत: मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग वाढला आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे, महिलांना कुठल्या क्षेत्रात जाण्यापासून रोखून धरणारी कुठलीही भिंत आता उरलेली नाही. लष्कर असो किंवा उद्योग क्षेत्र, अशा साऱ्याच क्षेत्रांमध्ये महिला आपला ठसा दमदारपणे उमटवत आहेत.

अल्प संसाधनांच्या साहाय्याने मोठे काम करणे खरे वैशिष्ट्य
कमी संसाधनांत मोठे काम करण्याची क्षमता भारताची ताकद ठरू शकते. तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करावी लागेल ही बाब खरी आहे. भारतातील तरुणाईला आर्थिक पाठबळ मिळाल्यास मोठा बदल घडवू शकतो. भारत तिसऱ्या जगातून कसा बाहेर पडेल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र उत्तर मिळवणे अशक्य अजिबातच नाही. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हे वास्तवात उतरेल.

बातम्या आणखी आहेत...