आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:न्यूयाॅर्क : फटाक्यांच्या आवाजाने त्रस्त लोकांचारात्रभर महापौरांच्या घराबाहेर कर्णकर्कश हॉर्न

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्याच दिवशी कडक निर्णय, ४२ अधिकाऱ्यांचे पथकही स्थापन
  • नव्या नियमांमुळे १००० पेक्षा जास्त भारतात अडकले; अनेक जण अाले हाेते कुटुंब साेडून!

अमेरिकेच्या अनेक शहरांतील लोक रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या आतषबाजी आणि फटाक्यांच्या आवाजाला वैतागले आहेत. विविध प्रसंगी होणारा जल्लोष किंवा निषेधावेळी फटाके लावले जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांची मात्र झोप उडाली आहे. सर्वात जास्त न्यूयॉर्क सिटीचे लोक त्रस्त आहेत. बेकायदा फटाक्यांना प्रतिबंध असतानाही आतषबाजी होते. रात्रभर फटाक्यांमुळे झोपमोड होत आहे. कॅलिफोर्निया, ब्रुकलिन, बाल्टीमोर, ऑकलंड या भागातील लोकही या प्रवृत्तीला वैतागले आहेत. आतषबाजीच्या विरोधात सुनावणी होत नसल्याने न्यूयॉर्क सिटीच्या लोकांनी त्यावर आपल्या पद्धतीने तोडगा शोधला. शहराचे महापौर बिल डी. ब्लासियो यांच्या घरासमोर लोकांनी आपल्या वाहनांचे हॉर्न वाजवले. हा गोंगाट ऐकून महापौर तेथे पोहोचले. ते सर्व हॉर्न वाजवत होते. आम्ही सुखाने झोपू शकत नाहीत. म्हणूनच तुम्हाला आम्ही शांत झोपू देणार नाही. लोकांचा पवित्रा पाहून महापौरांनी कडक पावलेही उचलली.

१२ हजार ५०० तक्रारी
रात्रीच्या आतषबाजीने लोक प्रचंड त्रस्त असून न्यूयॉर्क सिटीमध्ये आणीबाणी क्रमांकावर एक महिन्यात १२ हजार ५०० हून जास्त तक्रारी नोंदवण्यात आल्या. पहिल्यांदा आता ४२ जणांचे कृती दल स्थापन केले. त्यात १० पोलिस अधिकारी, १२ अग्निशमन दल कर्मचारी, २० तपास अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अमेरिकेतून अाजारी अाई-वडिलांसाठी भारतात आलेले, नव्या नियमांमुळे अडचण

अमेरिकेत एच१- बी सह अनेक अस्थायी वर्क व्हिसाधारकांच्या प्रवेशबंदीचे नवे नियम बुधवारपासून लागू झाले आहेत. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच या प्रकारच्या व्हिसाबंदीची घोषणा केली होती. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम भारतीयांवर झाला आहे. यामुळे भारतीय व्यावसायिकांसमोर केवळ रोजगाराचेच संकट निर्माण झाले नाही तर अनेक जण कुटुंबीयांपासून लांब झाले आहेत. भारतात जवळपास १ हजार जण असे आहेत जे कोरोना संकटादरम्यान अमेरिकेतून भारतात आले होते आणि आता नव्या नियमांमुळे येथेच अडकले आहेत. तर, त्यांचे पती किंवा पत्नी आणि मुले अमेरिकेतच आहेत. यातीलच एक आहेत पूर्वा दीक्षित, ज्या १० वर्षांपासून अमेरिकेत काम करत आहेत. पूर्वा आणि त्यांचे पती भारतीय नागरिक आहेत, तर दोन्ही मुले अमेरिकेचे. मार्चच्या सुरुवातीला पूर्वाची आई पलंगावरून पडल्याने गंभीर जखमी झाली, यामुळे पूर्वा कोरोनामुळे पती आणि मुलांना अमेरिकेत सोडून एकट्या मुंबईत आल्या. अमेरिकेत तात्पुरत्या परवान्यावर काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर पूर्वा दीक्षितला माहीत होते की, त्यांना कॅलिफोर्नियाला परतण्यासाठी पासपोर्टवर नवा व्हिसा स्टॅम्प मारण्यासाठी अमेरिकेच्या वाणिज्य वकिलातीत जावे लागेल. काही व्हिसाधारकांना परदेशी वारीसाठी हा स्टॅम्प मारावा लागतो. व्हिसा अपॉइंटमेंटच्या एक दिवस आधी १६ मार्चला कोरोनावर नियंत्रणासाठी लॉकडाऊन लागले आणि अमेरिकी काउन्सलेट बंद करण्यात आले. ८ दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...