आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माणुसकीला काळीमा फासणारी घटना:छत्तीसगडच्या दुर्ग नदीत तरंगताना आढळला नवजात मुलीचा मृतदेह; माफ कर मुली! नवरात्रातही आम्ही तुझे रक्षण करू शकलो नाही

भिलाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिमुकलीची नाळ देखील शरीरापासून वेगळी झाली नव्हती

वरील फोटो हृदय पिटाळून लावणारा आहे. कोणत्याही आईला तो पाहावा वाटणार नाही. तरीही छत्तीसगडच्या दुर्ग गावात असे घडले. येथील शिवनाथ नदीत दुर्गेचा मृतदेह सापडला आहे. दुर्गा म्हणजे नवजात मुलगी, जिला नवरात्रात देखील नदीत फेकून दिले. मुलीची नाळ देखील शरीरापासून वेगळी झाली नव्हती.

सदरील घटना जेवरा सिरसा परिसरातील आले. सोमवारी सकाळी शिवनाथ नदीत या नवजात चिमुकलीचा मृतदेह तरंगताना दिसला. डांडेसरा गावातील काही लोक अंघोळीसाठी नदीत उतरले होते. यावेळी त्यांना मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. मुलीच्या शरीरापासून नाळ वेगळी झाली नव्हती, यामुळे मृतदेह झाडांमध्ये अडकला होता.

10 महिन्यांत 7 मुलींचे मृतदेह सापडले

नवजात बाळाची नाळ जोडली असल्याने रविवारी रात्री जन्मल्यानंतर लगेच तिला नदीत फेकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शरीराला कोणताही टॅग नसल्यामुळे त्याची ओळख पटली नाही. तसेच मुलीला नदीत फेकले तेव्हा ती जिवंत होती मृत होती हे देखील समजले नाही. मागील 10 महिन्यांत या भागात 7 नवजात मुलींचे मृतदेह सापडले आहेत.